Personality Traits : प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्त्व हे वेगवेगळे असू शकते. काही ठराविक गोष्टीवरुन तुम्ही व्यक्तीचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे पण खरंय. सामुद्रिक शास्त्रानुसार आपण केसांच्या प्रकारावरुन माणसाचे व्यक्तिमत्त्व ओळखू शकतो. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
माणसाचे केस हे तीन प्रकारचे असतात. एक म्हणजे सरळ, दुसरे म्हणजे कुरळे आणि तिसरे म्हणजे पिळाकार. या केसांच्या प्रकारावरुन तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी बरेच काही जाणून घेऊ शकता.
सरळ केस
ज्या लोकांचे केस सरळ आहे ते खूप व्यावहारिक विचार करणारे असतात. ते त्यांची उद्दीष्टे सहज ओळतात आणि त्यांच्या मार्गात येणारी अडथळे दूक करतात. त्यांना नेहमी नवनवीन गोष्टी करण्याची तळमळ असते. ते नेहमी संतुलित आयुष्य जगतात. वेळ, पैसा आणि ठिकाणाबरोबर ते त्यांची कोणतीही इच्छा सुसंगत करण्याची योजना करतात. कोणत्याही गोष्टीमध्ये परिपूर्णता कधीही मिळत नाही. कठीण प्रसंगी शांत राहून हे लोक परिस्थिती हाताळतात.
कुरळे केस
कुरळे केस असणारे लोक नेहमी प्रत्येक दिवस भरभरून जगतात. जीवनाचा भरपूर आनंद घेतात.या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात उत्कटता, अंतर्दृष्टी आणि उबदारपणा दिसून येतो. ही वैशिष्ट्ये या लोकांना फायदेशीर ठरते. या लोकांच्या स्वभावात नाटकीपणा दिसून येतो ज्यामुळे क्षुल्लक गोष्टींवर वाद होण्याची शक्यता दिसून येते.पण यामुळे त्यांचे काही नुकसान होत नाही पण अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते.
या लोकांचा स्वभाव हा खूप उत्साही असतो. यामुळे हे खूप चांगला संवाद साधू शकतात. हे लोक स्वत:च्या विचारांवर ठाम असतात आणि इतर लोक यांच्या दृष्टीकोनाचा आदर करतात. अनेकदा लोकं तुम्हाला दु:खी करतात त्यामुळे तुम्ही कठोर बनता. तुमचे कुरळे केस तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे असण्याचा पुरावा आहे.
पिळाकार केस
पिळाकार केस असलेले लोक खूप सकारात्मक असतात. ते नेहमी ‘जे काही होईल ते होऊ द्या’ हा विचार करतात.त्यांचा हा दृष्टीकोन त्यांना पुढे काय आहे, याचा अंदाज घेण्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळे या लोकांवर पश्चातापाची वेळ येत नाही आणि अडथळा दूर होतो. तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा हे लोक त्याग करतात आणि ध्येयभिमुख मानसिकता अंगीकारतात. या लोकांना स्वतंत्र राहायला आवडते. हे लोक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. यांना एकटे राहायला आवडते आणि आत्मनिरीक्षण करायला हे लोक भरपूर वेळ घेतात. त्यामुळे यांच्याकडे लोक लगेच आकर्षित होतात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)