ऐतिहासिक स्थळं पाहण्यासाठी जरी पर्यटक फिलाडेल्फियाला येत असले तरीही द सिटी ऑफ ब्रदरली लव्ह अशी ओळख असणाऱ्या फिलाडेल्फियामध्ये कुटुंबाला एकत्रितपणे पाहता येतील अशी अनेक आकर्षक ठिकाणं आहेत, जिथं लहान मुलं त्यांच्या आवडीबाबत जिज्ञासा निर्माण होईल. ते नवे शोध लावू शकतील आणि खेळताना शिकू शकतील.

द फ्रँकलिन इन्स्टिट्यूट

 

जिज्ञासू मुले व कुटुंबियांचे द फ्रँकलिन इन्स्टिट्यूट नेहमीच स्वागत करतं आणि पर्यटकांना मानवी मेंदूशीसंबंधित गूढ उकलण्यास प्रवृत्त करतं, इलेक्ट्रिसिटीचं तंत्रज्ञान ते इथे शिकू शकतात. फ्लाइटच्या फोर्सेसचा अनुभव घेऊ शकतात किंवा एस्केप रूममध्ये स्वत:च स्वत:ला आव्हान देऊ शकतात. चारमजली आय-मॅक्स थिएटरमध्ये संपूर्ण कुटुंब चित्रपट पाहू शकते, ज्यामध्ये नभमंडळातील ताऱ्यांची अंतरे, विशाल अशा हृदयातून चालणे व बेंजामिन फ्रँकलिनने सुरुवातीला केलेल्या इलेक्ट्रिसिटीच्या प्रयोगांवरील चित्रपटांचा समावेश असतो.

द अकॅडमी ऑफ नॅचरल सायन्सेस ऑफ ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी

द अकॅडमी ऑफ नॅचरल सायन्सेस ऑफ ड्रेक्सेल युनिव्हर्सिटीमधील डायनॉसॉरस हॉल आणि बटरफ्लाय रूममध्ये येणारी कुटुंब हरवून जातात. दोन ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ‘टायनी टॉट एक्स्प्लोरर्स’मध्ये लहान मूल व त्याच्या पालकांना एकत्रितपणे गाण्यातून, गेममधून, प्रत्यक्ष कृतीतून आणि म्युझियम अॅडव्हेंचर्समधून निसर्गाचा आनंद घेण्याची संधी मिळते. त्यापेक्षा मोठ्या मुलांना ‘नाइट इन द म्युझियम’साठी स्लिपिंग बॅग भरावी लागते या उपक्रमात परस्परसंवादी कृतिसत्र, जिवंत प्राण्यांची भेट आणि डायनॉसॉर्सच्या अंगाखाली झोपण्याचा आनंद लुटता येतो.

प्लिज टच म्युझियम

द प्लिज टच म्युझियममध्ये मुलं आणि त्यांच्या पालकांना विविध परस्परसंवादी कार्यक्रमांत भाग घ्यावा लागतो, ज्यामध्ये पालकांचा उद्देश असतो मुलांचा दृष्टिकोन बदलणे. या सगळ्यामुळे खेळातून शिक्षणाची काय शक्ती आहे याचे सर्वांना ज्ञान होते.

रॉकेट रूममध्ये रॉकेट तयार करणे आणि ते उडवणे, उंचच उंच फॉक्स झाडाखाली मॅड हॅटरसोबत टी पार्टी करणे, इमॅजिनेशन प्लेग्राउंडमध्ये मोठमोठ्या फोमच्या ठोकळ्यांपासून मोठ्या इमारती किंवा शिल्प तयार करणं, साहसी खेळांदरम्यान नदीतील बदकं तरंगत असलेल्या भागातून बोट नेताना स्वत:ला कोरडं ठेवणं हे सगळे उपक्रम मुलांना खूप आवडतात. तुम्ही ऑन-साइट कॅफेमध्ये काही खाऊ शकता किंवा थिएटरमध्ये सुरू असलेल्या विशेष कार्यक्रमांचा आनंद घेता-घेता विश्रांती घेऊ शकता. म्युझियमच्या सर्वांत नव्या हेल्दी मी, हेल्दी फॅमिली, हेल्दी कम्युनिटी गॅलरीच्या माध्यमातून मुलांना पोषण आहार आणि शाश्वतता याबद्दल शिकवले जाते.

द फिलाडेल्फिया झू

अमेरिकेतील पहिले प्राणी संग्रहालय, द फिलाडेल्फिया झू कुटुंबांना आमंत्रित करते की या बंगालचा वाघ आणि सिंहाला जवळून पहा, मोठ्या मांजरी पहा आणि या प्राण्यांच्या नेहमीच्या मार्गांवरून तुम्ही हिंडा. झू -३६० या यंत्रणेच्या माध्यमातून या सर्व प्राण्यांच्या मार्गांचे जाळे सुरक्षित करण्यात आले असून त्यावरून कुटुंब फिरू शकतात.

झूमधील ट्री हाउसमध्ये मोठ-मोठ्या आकारांचे कीटक आहेत, डायनॉसॉरची अंडी आणि आत असलेले बोगदे यामुळे मुले त्यांच्या बालपणाचा आनंद लुटू शकतात. फिरत्या पट्ट्यावरच्या बिबट्यावर बसून मुले रपेट मारू शकतात. एका शांत लहान तळ्यात मुले आपल्या आई-बाबांसोबत पायडल बोट चालवू शकतात. जेव्हा हवामान आवश्यक तेवढं उष्ण असतं तेव्हा मोठी मुलं आपल्या पालकांसोबत झूच्या गरम हवेच्या फुग्यात बसून शहराचं विहंगम दृश्यही पाहू शकतात.

द फिलाडेल्फिया म्युझियम ऑफ आर्ट

नवोदित कलाकारांसाठी द फिलाडेल्फिया म्युझियम ऑफ आर्टमध्ये लहान मुलांना करता येतील असे विविध उपक्रम घेण्यात येतात. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना इथे मोफत प्रवेश आहे. यामध्ये मुलांचे विविध कलांचे क्लास घेतले जातात, फेरफटका आणि कला सादर करण्याची संधी तसेच सर्वोत्तम कलाकृतींची चित्र काढण्याची व त्यांच्याशी खेळण्याची संधी दिली जाते. उन्हाळ्यात प्रसिद्ध आर्ट स्प्लॅश कार्यक्रम घेतला जातो, ज्यामध्ये मुलांना त्यांच्या आईवडिलांसोबत कलाकुसर करावी लागते त्यामुळे त्यांच्यात कलेबद्दल आवड निर्माण होते. एकत्रित सहली, गाणी म्हणणे आणि सांगितिक कार्यक्रमही असतात.

द बार्नेस फाउंडेशन

जगभरातील इंप्रेशनिस्ट, पोस्ट इंप्रेशनिस्ट आणि आधुनिक युरोपीय चित्रांचं माहेरघर असलेल्या द बार्नेस फाउंडेशनमध्ये मुलांना कलेतून आनंद देणारे अनेक उपक्रम राबवले जातात. २-४ वर्षांच्या मुलांना त्यांच्या केअरगिव्हरसोबत वस्तू तयार करणे, गोष्टी सांगणे आणि इतर उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते या कार्यक्रमाला बार्नेस टॉडलर टाइम म्हणतात. पहिला रविवार फ्री फर्स्ट सनडे फॅमिली डे असतो त्या दिवशी के-१२ गटातील मुले स्वत:च्या कलावस्तू तयार करतात, कार्यक्रमांचा आनंद लुटतात या दिवशी कुटुंबीयही याचा आनंद लुटू शकतात.

फ्रँकलिन स्क्वेअर पार्क

फिलाडेल्फिया थीमवर आधारित १८ होल असलेलं छोटं गोल्फ कोर्स, मैदान, झोपाळा आणि एक आकर्षक कारंजं या सगळ्यामुळे फ्रँकलिन स्क्वेअर पार्क हे फिलाडेल्फियातील मूळच्या ५ स्क्वेअर्सपैकी एक सर्वोत्तम ठिकाण ठरलंय जिथे कुटुंब आनंद लुटू शकतं. मुलं लिबर्टी बेलमधून जाऊ शकतात, कॅरोसेलवर असलेल्या स्मार्टी जोन्सवर बसून एक फेरफटका मारू शकतात आणि फिलाडेल्फियातील सर्वोत्तम मैदानांपैकी एका मैदानात खेळून त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवू शकतात.

स्मिथ मेमोरियल प्लेग्राउंड

एका शतकाहून अधिक काळापासून खेळाडूंचे लाडके असलेले ठिकाण म्हणजे फिलाडेल्फिया शहरातील फेअरमाउंट पार्कमधील स्मिथ मेमोरियल प्लेग्राउंड. हे पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे २००,००० पर्यटक येतात. इनडोअर क्रिएटिव्ह खेळांनी भरलेल्या तीन मजल्यांमधून मुले खेळ निवडू शकतात. इथे १६,००० स्क्वेअर फुटांचे प्लेहाउस आहे. आणि बाहेरच्या मैदानाच्या कडेने संपूर्ण लाकडी स्लाइड आहे.

मॉरिस अर्बोर्टम ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया

पेनसिल्व्हेनिया राष्ट्रकुलाचे अधिकृत अर्बोर्टम म्हणून मान्यता असलेले आणि द नॅशनल रजिस्टर ऑफ हिस्टॉरिक प्लेसेसमध्ये नोंद असलेले मॉरिस अर्बोर्टम ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया ही पेनसिल्व्हेनियाच्या सर्वोत्तम खजिन्यांपैकी एक आहे. ते वर्षांतील सर्व मोसमांत सुंदर राहत असल्याने मुले आणि कुटुंबांना निसर्गाशी जोडण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाण आहे.

मुलांना साधारणपणे हंसाचं तळं, लॉग केबिन, फेर्नरी आणि बैल बेडकाचं शिल्प आवडतं. पक्षी निरीक्षण, झाडं ओळखणे, मोठ्य झुल्यासारख्या जाळ्यावर चढण्यात कुटुंबातल्या सगळ्यांनाच आनंद मिळतो. अर्बोर्टममध्ये वर्षभर कुटुंबाला केंद्रबिंदू ठेऊन कार्यक्रम राबवले जातात, ज्यामध्ये गोष्टी सांगा, निसर्गात भटकंती, योग आणि इतर क्लास घेतले जातात. त्याचबरोबर उत्सव व इव्हेंट्सही साजरे केले जातात.

अॅडव्हेंचर अक्वेरियम

डेलावेअर नदीवर एकादी छोटी सहल काढली तर तिथल्या अॅडव्हेंचर अक्वेरियममध्ये १,५०० प्रकारचे मासे पाहतात येतात. पेंग्विन आयलंड, सी टर्टल कोव्ह, हिप्पो हेवन आणि शार्क ब्रीज जिथे कुटुंब सर्वांत मोठ्या व्ही आकाराच्या हालत्या दोरीच्या पुलावरून चालू शकतात, जो शार्कच्या रिअल्म एक्झिबिटपासून केवळ काही इंच वर आहे. ही ठिकाणं कुटुंबांना खूप आवडतात. एका एक्झलरेटिंग टॅक्टिकल अनुभवाच्या माध्यमातून मुलांना समुद्रातील जीवन अनुभवण्याची सोयही इथे आहे, ज्यामध्ये मुलांना लहान शार्कना आणि स्टिंगरेजना हात लावता येतो.

अधिक माहितीसाठी, येथे क्लिक करा 

Story img Loader