वॉलमार्टच्या मालकीचे डिजिटल पेमेंट अॅप PhonePe आता वापरकर्त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे. तुम्ही यापुढे प्रत्येक व्यवहारासाठी काही अतिरिक्त चार्जेस आकारले जाणार आहे, त्यात तुम्ही जर हे चार्जेस शुल्क आकारले नाही तर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही किंवा तुमचा फोन रिचार्ज करू शकणार नाही. कंपनीने म्हटले आहे की ५० रुपयांपेक्षा जास्त मोबाइल रिचार्जसाठी १ रुपये ते २ रुपये प्रति व्यवहार शुल्क आकारले जाईल. UPI-आधारित व्यवहारांसाठी चार्ज सुरू करणारे PhonePe हे पहिले पेमेंट अॅप आहे.

५० रुपयांपेक्षा जास्त रिचार्जवर शुल्क भरावे लागेल

५० रुपयांपेक्षा जास्त UPI- आधारित व्यवहारांसाठी PhonePe एक प्रक्रिया शुल्क आकारेल. तुम्ही ५० रुपयांपर्यंत कोणतेही खर्च न केल्यास तुमच्याकडून डिजिटल अॅपद्वारे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इतर पेमेंट अॅप्सप्रमाणे, PhonePe देखील क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटसाठी प्रक्रिया शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

phonepe हे paytm आणि google pay सोबत भारतातील सर्वात लोकप्रिय, मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पेमेंट अॅप्स आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये त्याच्या प्लॅटफॉर्मवर १६५ कोटीहून अधिक यूपीआय व्यवहार नोंदवले गेले आहेत, ज्यामध्ये अॅप सेगमेंटचा हिस्सा ४०%पेक्षा जास्त आहे.

paytm आणि google pay प्रमाणे, phonepay चा वापर BHIM UPI सह पैसे हस्तांतरित करण्यासाठी अनेक बँक खाती व्यवस्थापित करण्यासाठी, खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी, एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि १४० + बँका वापरण्यासाठी केला जाऊ शकतो. यात अनेक बँक खाती जोडली जाऊ शकतात. तसेच जिओ, व्होडाफोन, आयडिया, एअरटेल इत्यादी प्रीपेड मोबाईल नंबर रिचार्ज करा. टाटा स्काय, एअरटेल डायरेक्ट, सन डायरेक्ट, व्हिडिओकॉन इ. सारखे डीटीएच रिचार्ज करू शकतात. त्याचबरोबर अनेक बिले भरा आणि बरेच काही. यात तुम्ही phonepay वापरून विमा पॉलिसी खरेदी किंवा रिन्यू देखील करू शकतात.

यावेळी फोनपेच्या प्रवक्त्याने पीटीआयला संगितले की, रिचार्जवर आम्ही एक अतिशय लहान प्रमाणात प्रयोग चालवत आहोत जिथे काही वापरकर्ते मोबाइल रिचार्जसाठी पैसे देत आहेत. तर यावेळी ५० रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर आकारले जाणार नाही, ५० ते १०० रुपयांच्या रिचार्जसाठी १ रुपये आकारले जाणार आहे आणि १०० रुपयांपेक्षा जास्त रिचार्जसाठी २ रुपये आकारले जातील.

PhonePe ने सांगितले की, “शुल्क आकारण्यासाठी आम्ही एकमेव कंपनी किंवा पेमेंट प्लॅटफॉर्म नाही. बिल पेमेंटवर थोडे शुल्क आकारणे आता एक स्टैंडर्ड इंडस्ट्री प्रैक्टिस आहे आणि इतर बिलर वेबसाइट आणि पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे देखील केली जाते. आम्ही फक्त क्रेडिट कार्ड पेमेंटवर प्रक्रिया शुल्क आकारतो.” त्यामुळे आता phonepe वर रिचार्ज, बिल भरणे यावर देखील शुल्क आकारले जाणार आहे

Story img Loader