मल्टीपल स्क्लेरॉसिस या विकारावरील औषध म्हणून ओळखली जाणारी गोळी आता वाईट स्मृती मेंदूतून पुसून टाकण्यासाठी वापरता येणार आहे. संशोधकांना असे दिसून आले की, उंदरांना फिंगोलिमॉड हे औषध देण्यात आले असता त्यांच्यात वेदनादायी स्मृती नष्ट झाल्या. हे औषध अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने मान्य केले आहे.
जर या औषधाचा परिणाम माणसावर अशाच पद्धतीने होत असेल तर त्यातून ज्या लोकांच्या पूर्वीच्या काही वाईट किंवा धक्कादायक स्मृती काढून टाकल्या जातात. फिंगोलिमॉड ही गोळी गिलेन्या या नावानेसुद्धा मिळते. रिचमंड येथील व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीच्या सारा स्पिगेल व त्यांच्या सहकाऱ्यांना असे दिसून आले की, यात हिस्टोन डेअॅसिटलाइज या वितंचकाचे काम निष्प्रभ केले जाते. उंदरांना एका कक्षात घेऊन त्यांच्या पायाला हलकेसे विजेचे धक्के दिले गेले व ते पिंजऱ्यात परत आल्यानंतर त्यांना थिजल्यासारखे झाले व नैराश्य आले. या हालचालविरहित अवस्थेत असलेल्या उंदरांना नंतर ही गोळी दिली असता त्यांच्या कटू स्मृती पुसल्या गेल्या, नेचर न्यूरोसायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
कटू स्मृतींना मेंदूतून नष्ट करणारी गोळी
मल्टीपल स्क्लेरॉसिस या विकारावरील औषध म्हणून ओळखली जाणारी गोळी आता वाईट स्मृती मेंदूतून पुसून टाकण्यासाठी वापरता येणार आहे.
आणखी वाचा
First published on: 27-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pill to erase bad memories in brain