Pink salt for beautiful skin: प्रत्येकाला निरोगी,स्वच्छ आणि तेजस्वी त्वचा हवी असते. परंतु, आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप कमी वेळ काढतात. जर तुम्हीही या लोकांपैकी एक असाल तर ही माहिती तुमच्याकरता खूप फायदेशीर ठरू शकते. आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही जास्त वेळ न घालवता तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. तुमच्या अंघोळीच्या दिनचर्येत थोडे बदल करून तुम्ही त्वचेला मऊ आणि चमकदार बनवू शकता.
त्वचेची काळजी कशी घ्यावी?
हल्ली अंघोळीसाठी बाजारात अनेक प्रकारचे बॉडी वॉश, बॉडी सोप किंवा शॉवर जेल उपलब्ध आहेत, जे मुलायम, चमकदार त्वचा प्रदान करण्याचा दावा करतात. परंतु, या महागड्या उत्पादनांव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यात गुलाबी हिमालयीन मीठ घालून तुमची त्वचा बाळासारखी मऊ आणि सुंदर बनवू शकता.
त्याचा कसा फायदा होतो?
गुलाबी हिमालयीन मिठामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, लोह, जस्त आणि इतर अनेक खनिजे असतात, जे शरीराला आराम देण्यास तसेच तुम्हाला ताजेतवाने वाटण्यास मदत करतात. हे तुमच्या शरीराला नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करतात आणि त्वचेला अनेक प्रकारे फायदा देतात.
एक्सफोलिएशन
सर्वप्रथम गुलाबी हिमालयीन मीठ मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करते, ज्यामुळे तुमची त्वचा अधिक स्वच्छ दिसते आणि त्वचेचा रंग सुधारतो.
जळजळ कमी होते
मॅक्स हॉस्पिटलम येथील ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंटचे असोसिएट डायरेक्टर डॉ. अखिलेश यादव स्पष्ट करतात, गुलाबी हिमालयीन मिठात मॅग्नेशियम असते. त्याच वेळी ते पाण्यात मिसळून अंघोळ केल्याने शरीराला मॅग्नेशियम चांगले शोषण्यास मदत होते, यामुळे त्वचेची जळजळ कमी होतेच, शिवाय स्नायूंनाही आराम मिळतो, ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.
हायड्रेशन
गुलाबी हिमालयीन मिठात असलेले पोटॅशियम त्वचेला हायड्रेट करते आणि ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे तुमची त्वचा मऊ दिसते.
त्वचा स्वच्छ होते
गुलाबी हिमालयीन मिठाचे पाणी त्वचेतील छिद्रे उघडते आणि त्वचेला खोलवर स्वच्छ करते, यामुळे तुमची त्वचा निरोगी दिसते.
त्वचेला पोषण देते
या सर्वांव्यतिरिक्त, गुलाबी हिमालयीन मिठात असलेले लोह रक्ताभिसरण वाढवून त्वचेला ऑक्सिजन प्रदान करते, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. दुसरीकडे या मिठात असलेले झिंक आणि इतर खनिजे एक्झिमा, सोरायसिस आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्या कमी करण्यासदेखील हातभार लावू शकतात.
मीठ किती वापरावे?
अंघोळीचे पाणी थोडे कोमट करा. जर तुम्ही बाथटबमध्ये अंघोळ करत असाल तर त्यात दोन छोटे कप गुलाबी हिमालयीन मीठ घेऊन पाण्यात १० मिनिटे टाकून ठेवा आणि नंतर हलक्या हाताने घासून अंघोळ करा.