उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक असते हे जरी खरे असले तरीही या जेवण्याच्या वेळाही योग्य असायला हव्यात. एखादवेळी दिवसा तुम्ही कोणत्याही वेळेला खाल्लेले चालू शकेल पण रात्रीचे जेवण मात्र झोपण्याच्या आधी ३ ते ४ तास आधीच व्हायला हवे. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहतेच पण चांगली झोप येण्यासही त्याचा उपयोग होतो. अशाप्रकारे जेवण्याच्या काही तास खाल्ल्यास खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. याचा आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे रात्री उशीरा जेवण करण्याची सवय आरोग्यासाठी निश्चितच घातक ठरु शकते. त्यामुळे पचनाच्या तक्रारी, लठ्ठपणा असे त्रास उद्भवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही रात्रीच्या वेळेस काही वेगळे म्हणजे अति तेलकट किंवा त्रास होणारे पदार्थ खाल्ल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास होउ शकतो. यामुळे तुमची रात्रीची झोप नीट होण्याची शक्यता कमी असते. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी देखील ताजेतवाने वाटत नाही. असे होईल नको असल्यास रात्रीच्या जेवणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत जे रात्रीच्या वेळेस खाणे टाळावेत. हे पदार्थ दिवसा खाल्ल्यास पोटावर फारसा परिणाम होत नाही मात्र रात्रीच्या वेळेस त्याचे सेवन केल्यास आरोग्यावर परिणाम होतो.

हेही वाचा : Dosa Making Tips: आता लोखंडी तव्यावर डोसा चिकटणार नाही, ‘या’ टिप्सच्या मदतीने बनवा कुरकुरीत डोसा

भजी

शक्यतो रात्रीच्या वेळेस भजी खाणे टाळावे. भजीमध्ये तेल असतेच मात्र त्या आम्लयुक्त असतात. त्यामुळे पित्त होऊ शकते. तसेच ते पचायला थोडे जड असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस भजी व तसेच तळलेले पदार्थ टाळल्यास आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.

संत्र

अनेकांना रात्रीच्या वेळेस फळे खाण्याची सवय असते. किंवा काही जण डाएट करत असतात ते फळांचे सेवन अधिक प्रमाणात करतात. मात्र संत्रे, लिंबू आणि बेरी व टोमॅटो यांसारखी आंबट फळे रात्री खाल्ल्यास पित्त होऊ शकते. तसेच रिकाम्या पोटी ही फळे खाणे टाळावे. या फळांच्या सेवनामुळे छातीमध्ये जळजळ होऊ शकते.

चॉकलेट

रात्रीचे जेवण झाल्यानंतर अनेकांना गोड खाण्याची सवय असते. अनेकदा लोक जेवल्यानंतर गोड पदार्थ म्हणून चॉकलेटचे सेवन करतात. रात्रीच्या वेळेस चॉकलेट खाल्ल्यास अ‍ॅसिड रिफ्लक्स होऊ शकतो.

हेही वाचा : दुधासह ‘हे’ पदार्थ तुम्हीही खाता का? आताच थांबवा, अन्यथा आजारी पडाल…

पिझ्झा

कधी कधी आपण रात्रीचे जेवण म्हणून पिझ्झा करतो किंवा ऑनलाइन ऑर्डर करतो. पिझ्झ्यामध्ये हाय फॅट असते. रात्रीच्या वेळी हा हाय फॅट असलेला पिझ्झा खाल्ल्यानंतर अ‍ॅसिडिटी होऊ शकते. तसेच पनीरमधील फॅट आणि टोमॅटो केचपमध्ये असलेले आम्ल यामुळे तुमची झोपही बिघडू शकते.

कॅफिन

अनेकांना रात्री उशिरापर्यंत जगण्याची सवय असते. काहीजण कमानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागत असतात. त्यावेळी ते चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. रात्रीच्या वेळेस चहा किंवा कॅफिन म्हणजेच कॉफीचे सेवन केल्यास पोटदुखी होऊ शकते. या पदार्थांचे सेवन केल्याने तुमची झोप देखील उडते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pizza chocolate orange 5 food to avoid eating at night acidity and stomoch problem tmb 01