निळंशार आकाश आणि रस्ते सहलींचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनायटेड स्टेट्समध्ये रेस्टॉरंट, बागा, संग्रहालयं आणि पर्यटनाच्या असंख्य संधी असलेली व्यवस्थित शहरं आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर एक चिरस्मरणीय सुट्टी व्यतीत करण्यासाठी प्राचीन नैसर्गिक सौंदर्य असलेलीही अनेक ठिकाणे येथे आहेत. तुम्ही जायलाच हवं अशी आठ ठिकाणं इथं देत आहोत.
१. मोअब, उतेह
सहज जाण्यासारखा हजारो चौरस किलोमीटर पसरलेल्या लाल दगडांचा मोअबमधील परिसर तुमचीच वाट पाहतोय जिथं प्रत्येकाला असीम आनंद आणि उत्साह मिळतो. नैऋत्य अमेरिकेतील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना पर्यटक निवांतपणे लहान शहरांतील आदरातिथ्याचाही अनुभव घेऊ शकतात. मोअब शहर माउंटन बायकिंग, हायकिंग, फोर-व्हील ड्रायव्हिंग किंवा नदीतून कितीही लांब आणि कितीही साहसी प्रवास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेला बेस कॅम्प आहे.
सर्पिलाकार वेटोळे घेत जाणाऱ्या कोलोरॅटो नदीचं शहरापासून जवळच असलेल्या डेड हॉर्स पॉइंट स्टेट पार्कमधील उंच पठारावरून जे दृश्य दिसतं तसं कुठूनच दिसणं शक्य नाही, त्याचबरोबर हे ठिकाण माउंटन बायकिंग, हायकिंग आणि मोठमोठ्या खिंडी पाहण्यासाठीही अगदी योग्य असे आहे. तसंच, या ठिकाणाहून कॅनोज, कयाक आणि पॅडेल बोर्ड वापरून कोलोरॅडो नदीच्या संथ प्रवाहाची सफर करण्यासारखी मजा नाही. नऊ देखणी शिखरं बघा, उंच पर्वतांतील वाटा तुडवा, आणि पहा मिल क्रीक, निग्रो बिल खिंड आणि प्रोफेसर क्रीक जिथं तुम्हाला चकित करतील वाळवंटात असलेले पाण्याचे धबधबे. जे सहलीसाठी किंवा निवांत ठिकाणाच्या शोधात आले आहेत, त्यांना इथले दोन तलाव मोहात पाडतील.
२. न्यू ऑरलिअन्स, ल्युसिआना
कॅरेबियन, अमेरिकी, फ्रेंच आणि अफ्रिकी संस्कृतींच्या मिश्रणातून तयार झालेल्या एका अद्वितीय स्वाद, भावना आणि संगीताचा अनुभव घ्यायचा असेल तर वर्षाच्या कुठल्याही काळात न्यू ऑरलियन्स कायम पर्यटकांच्या जल्लोषी स्वागतासाठी उत्सुक असते. जॅझ संगीताचं जन्मस्थान असलेल्या या ठिकाणाच्या कणाकणात संगीत आहे, इथले लोक रसनातृप्तीसाठी जगतात आणि इथला प्रत्येक दिवसच जणू पार्टीचा, साजरा करण्याचा असतो. शहरी जीवन आणि ग्रामीण वनराई, दलदलीतील टूर्स, उत्सव, ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी आणि मार्डी ग्रासच्या वेळची मौजमजा, न्यू ऑरलियन्समध्ये प्रत्येकाला खेचून घेणारं आकर्षण आहे.
लुईस ऑर्मस्ट्राँगसारख्या महान संगीतकारापासून आताच्या ट्रॉम्बोन शॉर्टी, ब्रॅनफोर्ड मार्सिलिस आणि हॅरी कॉनिक ज्युनिअरपर्यंतच्या संगीतातील दिग्गज जगाला न्यू ऑरलियन्सने दिले आहेत. दरदिवशी व दररात्री इथे लाइव्ह संगीताचे कार्यक्रम सुरू असतात आणि आठवड्याभरात होणाऱ्या अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांत पुरस्कार-विजेते कलाकार आपली कला सादर करतात. न्यू ऑरलियन्सची जॅझ संगीताची परंपरा जपणाऱ्या प्रीझर्व्हेशन हॉलला आवर्जून भेट द्या. राष्ट्रीय वर्ल्ड वॉर २ संग्रहालय तसेच प्रेसबेटियर आणि कबिल्डो पुतळ्यांच्या संग्रहालयाला भेट दिलीत तर तुमच्या वेळेचा सदुपयोग होईल.
३. माउई, हवाई
तुम्ही माउईमध्ये असाल तर ‘मी आज काय करू?’ या प्रश्नाला उत्तर नाही असं होणारच नाही, कारण इथं प्रत्येक वळणावर काहीतरी बघण्यासारखं आहे. त्यातलं काही मजेदार आणि क्रियाशील, काही सांस्कृतिक व ऐतिहासिक, काही लाड पुरवणारं, काहीतरी प्रचंड सुंदर असेल. तुमची बेटांबद्दलची स्वप्नं इथं सत्यात उतरतात, जिथ बसून नुसतं समुद्राच्या लाटा न्याहाळाव्या असे अप्रतिम समुद्र किनारे, जगातल्या सर्वांत सुंदर कोर्सपैकी एक असलेल्या कोर्सवर गोल्फ खेळण्याचा आनंद लुटणं, सृष्टी अनुभवणं, लहान-लहान खेड्यांचं सौंदर्य शोधणं किंवा अद्वितीय हिरवाई आणि फोटोत शोभतील अशा धबधब्यांच्या साथीनं रस्त्यांवरून वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवणं हे सगळं इथं अनुभवता येतं.
विविधरंगी बिचशी गप्पागोष्टी करण्यासाठी तुम्हाला माऊईच्या पूर्वेला असलेल्या वाईनापिनाचा काळ्या वाळूचा बिच, काईहालुलु इथला लाल वाळूचा बिच आणि राखाडी वाळूचा अर्धचंद्राकार हमोआ बिचच्या सफरीवर जायला हवं. पर्यटकांच्या केंद्रातून जणू चित्रासारखाच दिसणारा सूर्योदय पहा आणि मग चढून किंवा गाडीने गाठा माऊईतील सर्वोच्च शिखर. विशाल वडाची झाडं, भयावह असं बांबूचं जंगल आणि माकाहिकु आणि वाईमोकु धबधबे अशी अनेक फोटोजेनिक ठिकाणं तुम्हाला पाहता येतील पिपिवाईच्या फेरफटक्यात. लाओ व्हॅली स्टेट पार्कमधील १७९०च्या ऐतिहासिक युद्धभूमीजवळ तुम्हाला ३६६ मीटर उंच लाओ नीडल या सुळक्याचे फोटो घेता येतील. माकावाओ गावात तेथील कलेचे दर्शन घडेल आणि तुम्हाला इथं भेटू शकतात. ‘पॅनिओलो’ नावाचे हवाईतील काउबॉय. ऐतिहासिक पाइया गावात तुम्हाला हिप्पी आणि भटकंती करणाऱ्यांच्या छोट्या-छोट्या दुकानांतून खरेदी करता येईल. चवीच्या खवय्यांनी इथलं क्रिस्पी कॅलमरी, नारळातला झिंगा आणि कीहेई भात खायची संधी सोडू नये.
४. सीएटल, वॉशिंग्टन
खाण्या-पिण्याच्या गोष्टींनी संपन्न, निवडक पर्यटनयोग्य शेजार आणि अचंबित करणारे समुद्रकिनारा असणारे सीएटल हे शहर अमेरिकेच्या वायव्येला पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. शहराची ओळख असलेल्या आणि १९६२च्या जागतिक जत्रेची आठवण म्हणून उराशी बाळगलेल्या १८५.५ मीटर उंचीवर असलेल्या स्पेस नीडलवर असलेल्या निरीक्षणगृहातून सीएटल शहराचं विहंगम दृश्य पाहणं ही एक पर्वणीच आहे. अमेरिकेतील शेतकऱ्यांनी चालवलेल्या सर्वांत जुन्या सातत्याने सुरू असलेल्या समुद्रकिनारी असलेल्या पाइक प्लेस मार्केटमध्ये स्थानिकांसोबत, पर्यटकांचीही खरेदीसाठी झुंबड उडते.
देशातल्या काही स्वागतार्ह समुद्र किनाऱ्यांवर तुम्ही पॅडलिंग, बोटिंग, सेलिंग आणि मासेमारीचा आनंद लुटू शकता किंवा पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यावर व्हेल पाहण्याची संधीही तुम्हाला मिळू शकते. सीएटलपासून काही तासांच्या अंतरावर असलेली नॉर्थ कॅसकेड्स नॅशनल पार्क, ऑलिंपिक नॅशनल पार्क, आणि माउंट रेनिअर नॅशनल पार्क ही तीन राष्ट्रीय उद्यानेही तुम्ही पाहू शकता. स्थानिकांच्या तोंडून तुम्ही ‘द माउंटन इज आउट’ असे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील त्याचा अर्थ असा आहे की, दक्षिणेला १६१ किलोमीटर अंतरावर असलेला माउंट रेनिअर हा बर्फाच्छादित पर्वत तुम्हाला इथूनच दिसेल. पाइक प्लेस मार्केट आणि सीएटल आर्ट म्युझियम ही डाउनटाऊन सीएटलमध्ये असलेली ठिकाणे पहायला विसरू नका. शहरभरात असलेली विविध ऑफबीट फ्रेमाँट- सार्वजनिक कलाकृती शिल्प पाहताना मन हरखून जातं. विविध झुडुपांना कापून तयार केलेलं डायनासोर्सचं शिल्प आणि याच झुडुपांचा पूल हे सगळंच विलक्षण सुंदर आहे. सीएटलच्या संगीताचा दीर्घकालीन वारसा कथांच्या माध्यमातून उलगडणारे म्युझियम ऑफ पॉप कल्चर (MoPOP) हे पहायला विसरू नका.
५. केप कॉड, मॅसेच्युसेट्स
केप कॉड व मार्टाज विनयार्ड आणि नानटकेट या बेटांवरील नैसर्गिक बिच आणि समुद्रकिनाऱ्यावरचं न्यू इंग्लंडसारखी जीवनशैली यासाठी केप कॉड जगप्रसिद्ध आहे. समुद्री वाऱ्यांनी सुखावणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर बसल्यावर अटलांटिक समुद्राच्या क्षितीजावर नाट्यमय घडामोडी दिसतात. हाच किनारा दीपस्तंभांवरील दिवे आणि शेकोट्यांच्या प्रकाशाने रात्री उजळून निघतो. १५ गावं आणि मासेमारी करणारी खेडी यांमुळे या परिसराचं समुद्र वैभव आणि प्रेमाची हवा जाणवते. त्याचबरोबर ग्लासवर्क स्टुडिओ, विनयार्डसपासून ते थेट समुद्रातून आणलेले ताजे अन्न देणारे गॅबल्ड इन्स सर्व सेवा पुरवतात. या ६४ किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर सहा बिच आहेत, पण केप कॉड राष्ट्रीय समुद्रकिनाऱ्यावर असा भास होतो की समुद्री वाळूचा बिच क्षितिजापर्यंत पसरला आहे.
पोहायला आणि बीच कोंबिगसाठी किंवा इतर खेळांसाठी तसंच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बाइक-वेवरून सायकल चालवण्यासाठी तसेच समुद्रात सर्फिंग करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. केप कॉडमधील नैसर्गिक अधिवास पाहण्यासाठी तुम्हाला निकरसन स्टेट पार्कमध्ये जायला हवं जिथे तुम्हाला गोड्या पाण्यातील ट्राउटची मासेमारी करता येईल किंवा कनोइंगही करता येईल. वाइल्ड लाइफमध्ये रमायचं असेल तर तुम्हाला मोनोमोय नॅशनल वाइल्ड लाइफ रेफ्युजमध्ये जायला हवे. केप कॉडचा पेनिन्सुला अशा विचित्र आकारात आहे, त्यामुळे केप कॉडचा किनारा तुम्हाला वेगवेगळ्या आकारांच्या आणि उंचीच्या व रंगांच्या दीपस्तंभांनी सजलेला दिसेल. काही फेरीबोटीतून फेरफटका मारताना पाहता येऊ शकतात पण पाच दीपस्तंभ सर्वांसाठी खुले आहेत. सँडविच ग्लास म्युझियम, केप कॉड म्युझियम ऑफ आर्ट आणि आर्ट अँड अक्वेरियम ऑफ नॅशनल मरिन फिशरिज हे पहायला विसरू नका.
६. पोर्टलँड, ओरेगॉन
पोर्टलँडमध्ये पाहण्यासारखी इतकी ठिकाणं आहेत की तुम्ही नक्कीच एखादं बाहेरचं ठिकाण पहायला विसराल. इथे तुम्हाला असा समाज दिसेल की, ज्याने शाश्वतता, संशोधित व सहज उपलब्धता जपण्यासाठी वाहून घेतले आहे. सर्वदूर सहजतेने घेऊन जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, करमुक्त खरेदी आणि शहरातील अनेक बगिचे आणि डझनावारी सांस्कृतिक आकर्षणस्थळे यामुळे तुम्ही भारावून जाल. पोर्टलँडमध्ये तुम्हाला संगीताचा आस्वाद देतं त्याचबरोबर देखणी ठिकाणं शिल्पकृती पाहून मन आनंदून जातं. इथल्याचायनाटाउनमध्ये दर शनिवारी भरणाऱ्या बाजारात तुम्हाला कला, शिल्प, अन्नपदार्थ आणि स्ट्रीट कल्चरचा मनमुराद आनंद लुटता येईल आणि तुम्ही पोर्टलँडवासीच होऊन जाल. ८९ ब्रुअरिजमध्ये किंवा इथल्या पबमध्ये एक फेरफटका मारा.
शहराच्या मध्यवस्तीत असलेलं वॉशिंग्टन पार्क हे एक विलक्षण पर्यटन स्थळच आहे. तुम्ही जगभरातील फुलांनी सजलेलं ह्योट अर्बोर्टम, अमेरिकेतील सर्वांत जुन्या बागांपैकी एक असलेलं द इंटरनॅशनल रोज टेस्ट गार्डन, पाच वेगवेगळ्या बागांचं मिळून तयार झालेलं द जॅपनीज गार्डन इथे पाहू शकता. पोर्टलँडमधील कला व सांस्कृतिक संस्थांचा खूप नावलौकिक आहे. ऑरेगॉन सिम्फनी किंवा पोर्टलँड ओपेरामध्ये एखादा कार्यक्रम ऐका. ऑरेगॉन बॅले थिएटरमध्ये नृत्याचा आनंद लुटा.
७. मेम्फिस, टेन्नेसी
जिथं ब्लुज संगीत बहरलं, रॉक अँड रोल संगीताचा जन्म झाला आणि नागरी हक्क चळवळींना सुरुवात झाली असं ठिकाण म्हणजे मेम्फिस. ग्रेसलँड, एल्व्हिस प्रस्लेचं शेवटचं घर, किंवा मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअरचा जिथं मृत्यू झाला तिथं असलेलं नॅशनल सिव्हिल राइट्स म्युझियम पहायला जाताना पर्यटक इतिहासात रमून जातात. नव्या मेम्फिसमध्ये विशेषकरून प्राणीमित्रांसाठी खूप आकर्षणे आहेत. मेम्फिसमधलं द पिबॉडी, हे सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल हे तर रिगल प्रजातीच्या बदकांचं माहेरघरच आहे, जिथं हॉटेलच्या चकचकीत लॉबीत असलेल्या कारंज्यात ही बदकं विहरत असतात. सिल्की ओ सुल्लीवनकडे तुम्हाला खूप उत्तम बार्बेक्यू मिळतील पण बिअरच्या चाहत्यांसाठी ते सर्वांत मोठं आकर्षण आहे. आणि त्यानंतर आहे निऑनच्या दिव्यांनी न्हाऊन निघालेली बिअले स्ट्रीट, जिथे लुईस आर्मस्ट्राँग आणि बी. बी. किंग यांनी गाणं सादर केलं आणि त्या गाण्याच्या पद्धतीला मेम्फिस ब्लूज हे नाव मिळवून दिलं, ती तुम्ही पाहू शकता. बिअले स्ट्रीटचा आस्वाद घेण्यासाठी रम बुगी किंवा बी. बी. किंग्ज ब्लूज क्बलमध्ये चक्कर टाका. संगीतप्रेमींना मेम्फिस रॉक अँड सोल म्युझियम, जिथे एल्व्हिस प्रेस्ले, जेरी ली लुईस, कार्ल पर्किन्स आणि जॉनी कॅश यांना करिअरची सुरुवात करायची संधी मिळाली तो सन स्टुडिओ, स्टॅक्स म्युझियम ऑफ अमेरिकन सोल म्युझिक जे मूळच्या स्टॅक्स रेकॉर्डिंग स्टुडिओत आहे ते पहायला नक्कीच आवडेल.
८. ऑस्टिन, टेक्सास
ऑस्टिन शहराचं व्यक्तिमत्वच विचित्र, संमिश्र शिक्षितांचं आणि टेक्साच्या धैर्याचं द्योतक असलेलं असं आहे. विली नेल्सनने आपली संगीताची वेगळी पद्धत जिथं विकसित केली ते तीन दशकांपासून छोटं विद्यापीठ असलेलं शहर आता जागतिक उत्सवांसाठी प्रसिद्ध असलेलं, जगभरातील आकर्षणांचा केंद्रबिंदू झालेलं, दिव्यांनी उजळलेली आकाशरेषा असणारं आणि १.९ दशलक्ष लोकसंख्या असलेलं मेट्रोपोलिटन शहर झालं आहे. ऑस्टिनमधलं संगीतक्षेत्र हे महानच आहे इथली वेअरहाउस डिस्ट्रिक्ट, सिक्स्थ स्ट्रीट आणि रेड रिव्हर एंटरटेनमेंट डिस्ट्रिक्ट ही ठिकाणं म्हणजे संगीताची नंदनवनंच. शहराच्या संगीताच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणजे काँटिनेंटल क्लब जिथे जबरदस्त रॉक, ब्लुज आणि कंट्री कलाकार आपल्या कलेनं आसमंत भरून टाकतात.
जवळ-जवळ १,००० फूड व्हेंडरच्या सेवा उपलब्ध असल्याने ऑस्टिन हे जगभरातील पाककलेतील सर्जनशीलतेने बनवलेले पदार्थ मिळण्याचे ठिकाण झाले आहे. स्थानिकांना चिलांट्रोचे कोरिअन टाकोज आणि शाकाहारी पदार्थांत अर्लो, हे कपकेककडचे गोड पदार्थ आणि द पिच्ड टॉर्टिलाकडचे आशियाई फ्युजन हे पदार्थ खूप प्रिय आहेत.
बुलक टेक्सास स्टेट हिस्ट्री म्युझियममध्ये तुम्हाला एकमेव स्टार राज्याची कथा बघायला मिळेल, त्याचबरोबर वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू बघायला मिळतील. त्याचबरोबर आयमॅक्सचा अनुभव घ्यायला विसरू नका. टेक्सास विद्यापीठातील ब्लँटोन म्युझियम पाहणे हे कलासक्त माणसाचं स्वप्न असतं, ज्यामध्ये अमेरिकी, युरोपीय आणि लॅटिन अमेरिकेतील कलाप्रकारांचे १८,००० नमुने आहेत.