अनेक लोकांना आपल्या घरासमोर किंवा इमारतीच्या गच्चीवर विविध प्रकारची झाडांची रोपे लावायला खूप आवडतं. शिवाय ते या रोपांची काळजी मनापासून घेतात. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही रोपे कोमेजून जाण्याची शक्यता असते. विशेषतः आपण जेव्हा बाहेर फिरायला जाणार असतो, तेव्हा आपण लावलेल्या रोपांना पाणी कोण घालणार? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. शिवाय रोपांना पाणी घातलं नाही तर ती उष्णतेमुळे सुकून जाऊ शकतात. पण आता तुम्हाला बाहेर फिरायलाही जाता येईल आणि झाडांची रोपेही टवटवीत आणि हिरवीगार ठेवता येतील. हो कारण उन्हाळ्याच्या दिवसात रोपे हिरवीगार कशी ठेवायची याबाबतच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. या टिप्स वापरल्यास तुम्ही झाडांना १० दिवस पाणी घातलं नाही तरीही ती कोमेजणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झाडांची रोपं हिरवीगार आणि टवटवीत ठेवण्याच्या टिप्स –

_theleafgarden नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही घरातून बाहेर जाणार असाल तर तुम्ही लावलेल्या झांडांच्या कुंडीमधील माती ओली कशी ठेवायची, तसेच झाडे टवटवीत कशी ठेवायची याबाबतच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.

नारळाची साल –

तुम्ही लावलेली रोपे हिरवीगार ठेवण्यासाठी नारळाच्या सालींचा वापर करा. यासाठी नारळाची साल पाण्यात भिजवून ठेवा आणि जेव्हा तुम्ही घराबाहेर जाणार असाल तेव्हा ती कुंडीच्या वरच्या पृष्ठभागावर ठेवून द्या. ओल्या नारळाच्या सालीमुळे माती सुकणार नाही आणि त्यातून हळूहळू पाणी गळत राहिल, ज्यामुळे रोपांना पाण्याची कमतरता भासणार नाही.

हेही वाचा- Health Special: ऋतूबदल झाला की, रोगजंतूंना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ टाळा!

पाहा व्हिडीओ –

बाटलीद्वारे पाण्याची व्यवस्था –

तुम्ही जेव्हा बाहेर जाणार असाल तेव्हा झांडासाठी पाण्याची व्यवस्था करा. यासाठी तुम्ही एका बाटलीला छिद्र पाडून त्यामध्ये दोरी घाला आणि ती बाटली कुंडीत उलटी लटकवा. या बाटलीत पाणी भरा. दोरीच्या साहाय्याने पाणी हळुहळू कुंडीत जाईल ज्यामुळे रोपांना पाणी मिळेल आणि ती सुकणार नाहीत.

ओलं कापड –

जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर रोपांना पाणी घाला आणि नंतर त्यावर ओलं कापड गुडांळून कुंडीत ठेवा, असे केल्याने जमिनीत ओलावा राहील आणि रोपे लवकर सुकणार नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Planting tips even if you forget to water the plant the plant will remain fresh see this video to keep plants healthy jap
Show comments