दैनंदिन आयुष्यात आनंदी रहायचे आणि रोजच्या कामाचा व्याप कार्यक्षमपणे सांभाळायचा या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ नक्की कशाप्रकारे साधायचा, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असेल. मात्र, नुकत्याच झालेल्या एका शास्त्रीय पाहणीत एक आश्चर्यकारक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. कामावर असताना काही मिनिटांचा ब्रेक घेऊन अँग्री बर्डसारखे मोबाईल गेम्स खेळल्याने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते, असे या पाहणीत दिसून आले. कर्माचाऱ्यांच्या मोबाईल फोनवर गेम खेळण्याच्या सवयीमुळे कंपनीचा तोटा होण्याऐवजी उलट फायदाच होतो असा निष्कर्ष अमेरिकेतील कान्सस विद्यापीठातील संशोधकांनी नुकताच जाहीर केला. यासाठी पुर्णवेळ काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील ७२ कर्मचाऱ्यांचे निरीक्षण करण्यात आले होते. आपल्या आठ तासांच्या कामावरील वेळेदरम्यान, साधारण २२ मिनिटांचा कालावधी या कर्मचाऱ्यांनी स्मार्टफोनवरील गेम्स खेळण्यासाठी वापरला. मात्र, यामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदी राहण्यात आणि कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Play angry birds to be more happy productive