फुटबॉल आणि धावण्यापेक्षा टेनिस, जलतरण आणि एरोबिक्स या खेळांमुळे दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य मिळते, असे एका नव्या अभ्यासात आढळून आले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, जे लोक रॅकेटशी संबंधित असणारे टेनिस, स्क्वॅश किंवा बॅटमिंटन खेळ खेळतात त्यांना हृदयरोग आणि आघात होण्याचा धोका ५६ टक्क्यांनी कमी असतो.

loksatta kutuhal artificial intelligence for wildfire prediction
कुतूहल : वणव्यांच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल

जलतरणामुळे हृदयरोगाचा धोका ४१ टक्क्यांनी कमी होतो, तर एरोबिक्समुळे ३६ टक्के प्रमाण कमी होते. मात्र जे लोक फुटबॉल, धावणे आणि रग्बी यांसारखे व्यायाम करतात त्यांच्यामध्ये याचा कोणताही फायदा दिसून आला नाही.

रॅकेट हा फक्त खेळ नसून त्यामुळे अतिरिक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे होतात, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शारीरिक हालचाली आणि लोकसंख्या आरोग्यचे सहयोगी प्राध्यापक चार्ली फोस्टर यांनी म्हटले आहे.

आम्ही तरुणांचा संघीय खेळ खेळणारा संघ आणि धावणारे खेळाडू यांचा अभ्यास केला. यामध्ये जास्त फरक दिसून आला नाही. यामध्ये जवळपास ८० हजार लोकांचा ९ वर्षे अभ्यास करण्यात आला आहे. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हे संशोधन ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट मेडिसिनमध्ये चालू आठवडय़ात प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)