शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचा संघर्ष पाहता केंद्र सरकार त्यांना सन्मान म्हणून शेतकरी निधी देत आहे. ही योजना केंद्र सरकारने २०१८ मध्ये पंतप्रधान किसान योजना म्हणून सुरू केली होती. सरकार दरवर्षी ६,००० थेट देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. हे पैसे सरकार तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना देते. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार रुपये झाले जमा
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सरकारने या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात २०,००० रुपये वर्ग केले आहेत. तसेच काही रजिस्टर्ड केलेल्या शेतकर्यांच्या खात्यात आतापर्यंत १० हप्ते पोहोचले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाऊ शकतो. लाभार्थ्याने नियोजित वेळेपूर्वी यादीतील आपले नाव तपासणे आवश्यक आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये
१ जानेवारी २०२२ रोजी नवीन वर्षाची सुरुवात होताच शेतकऱ्यांना या योजनेचा १० वा हप्ता देण्यात आला आहे. आता लवकरच PM किसान योजनेअंतर्गत ११ वा हप्ता येणार आहे. अशा परिस्थितीत, योजनेच्या लाभार्थ्यांना एक विशेष संधी आहे आणि त्यांना यावेळी ४००० रुपये मिळू शकतात. मात्र नवीन अर्जदारांनाच हा लाभ मिळणार आहे. वास्तविक ही संधी अशा शेतकऱ्यांना दिली जाईल जे या योजनेसाठी पात्र आहेत, परंतु अद्याप अर्ज करू शकलेले नाहीत.
इतके पैसे खात्यात येतील
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी योजनेच्या सर्व अटी पूर्ण केल्या, तर अशा शेतकऱ्यांना ११ वा हप्ता म्हणून ४०० रुपये मिळण्याची संधी आहे. जर नवीन शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२२ पूर्वी PM किसान योजनेसाठी स्वतःची नोंदणी केली तर त्यांना दोन हप्त्यांचे पैसे मिळतील. म्हणजेच ११ व्या हप्त्यासोबत, दहाव्या हप्त्याचे २००० रुपये जोडून त्यांना एकूण ४००० रुपये मिळू शकतात.
पीएम किसान योजनेअंतर्गत आता शेतकरी ११ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे १० हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. पीएम किसान योजना २०२१ मध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला होता, त्यानुसार आता शेतकऱ्यांना ११ व्या हप्त्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करावे लागणार आहे. म्हणजेच आता ११ व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना अनेक नवीन नियमांसह अर्ज करावा लागणार आहे.
जाणून घ्या e-KYC प्रक्रिया
आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी फार्मर्स कॉर्नरमधील ‘EKYC’ पर्यायावर क्लिक करा
बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.
तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने ते घरी बसून पूर्ण करू शकता.
यासाठी, सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जावे लागेल.
उजव्या बाजूला तुम्हाला टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.