अनेकांना निद्रानाशाची समस्या असते. कधी कधी खूप प्रयत्न करूनही झोप येत नाही. आली तरी मध्येच तुटते. निद्रानाशामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कमकुवत प्रतिकारशक्ती, अशा स्थितीत झोपेशी संबंधित आयुर्वेदाचा सिद्धांत प्रभावी ठरू शकतो. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये याचा उल्लेख केला होता.

झोपेबद्दल आयुर्वेद काय सांगतो?

आयुर्वेदानुसार झोप ही केवळ शरीर आणि मनाच्या विश्रांतीसाठी आवश्यक नाही तर ती शरीराला डिटॉक्सिफाय करते. आयुर्वेदानुसार, झोप ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये आपण आपल्या सर्व इच्छांपासून दूर जातो. यामुळे शरीर आणि मनाला विश्रांती मिळते आणि थकवा दूर होतो. आयुर्वेद सांगतो की झोपेमुळे शरीराच्या अंतर्गत ऊतींवर आणि सर्व अवयवांवर सकारात्मक परिणाम होतो. चांगली झोप घेतल्यावर ताजेतवाने वाटते.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ

निद्रानाशाची कारणे कोणती?

निद्रानाशाची अनेक कारणे असू शकतात . indianexpress.com साठी लिहिलेल्या लेखात डॉ. सुभाष एस. मार्कंडेय लिहितात की जर एखाद्याला निद्रानाशाची समस्या असेल तर सर्वप्रथम त्याने आपली दिनचर्या निश्चित करावी. झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरलेली असावी. उदाहरणार्थ, जर कोणी दिवसा झोपत असेल तर त्याला आळशी वाटते.

( हे ही वाचा: कांद्याच्या रसाने खरोखरचं केस गळणे थांबतात का? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)

त्याचप्रमाणे वेळेवर झोप न आल्यास संपूर्ण संतुलन बिघडते. जर तुम्ही कमी झोपत असाल किंवा रात्री मध्येच उठत असाल तर ऊती कोरड्या होऊ शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही जास्त झोपत असाल तर हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. डॉ. सुभाष एस. मार्कंडेय लिहितात की साधारणपणे उन्हाळ्यातच दिवसा झोपावे, कारण उन्हाळ्याचे दिवस मोठे असतात, तेही लहान मुले, वृद्ध किंवा आजारी व्यक्तींसाठी.

निद्रानाश टाळण्यासाठी काय करावे?

  • तुमची दिनचर्या निश्चित करा. जेणेकरून शरीराचे चक्र सुरळीत होईल.
  • पचन आणि झोप यांचा खोल संबंध आहे. जर तुम्ही संध्याकाळी जड जेवण केले तर ते तुमची पचन प्रक्रिया मंदावते आणि तुमची झोपेमध्ये व्यत्यय आणते.
  • नेहमी रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान ३ तास आधी करण्याचा प्रयत्न करा.
  • आयुर्वेदानुसार, तुम्ही एक कप गरम गाईचे दूध किंवा खीर खाऊ शकता, किंवा एखादे गाणे ऐकू शकता किंवा झोपण्यापूर्वी पायांना हलका मसाज करू शकता. ते वात संतुलित करते.

निद्रानाश टाळण्यासाठी ३-२-१ फॉर्म्युला काय आहे ?

आयुर्वेदानुसार, ३-२-१ फॉर्म्युला निद्रानाश किंवा झोपेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. झोपण्याच्या किमान ३ तास आधी जेवण करा, झोपण्याच्या २ तास आधी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स बाजूला ठेवा. झोपण्याच्या एक तास आधी तुम्ही पुस्तक वाचू शकता. यामुळे चांगली आणि गाढ झोप लागते. निद्रानाशाची समस्याही दूर होते .

Story img Loader