महाराष्ट्रात पोहे हा सर्वांचाच आवडता नाश्ता आहे. लग्न ठरवताना देखील कांदे-पोह्यांचा कार्यक्रम केला जातो. चवीसोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने आपण तंदुरुस्त तर होतोच, सोबतच वजन कमी करण्यासही हे उपयुक्त आहेत. यामध्ये कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात आढळते आणि त्यात शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे देखील असतात. सकाळच्या वेळी लोकांना पोहे खायला आवडते कारण ते सहज पचतात. जाणून घेऊया पोह्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की नाश्त्यामध्ये दररोज पोहे खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. पोहे खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता आणि तुमची पचनक्रिया चांगली राहते. त्याचबरोबर, जर तुम्ही नाश्त्यात सोयाबीन, ड्रायफ्रूट्स आणि अंडी खाल्ल्यास तुम्हाला प्रोटीनसोबतच जीवनसत्त्वेही मिळतात.

तुम्हालाही येत असेल प्रमाणाच्या बाहेर राग, तर ‘या’ टिप्सचा वापर करून मिळवा रागावर नियंत्रण

भरपूर प्रमाणात लोह

नियमित एक प्लेट पोहे खाणाऱ्या व्यक्तीमध्ये लोहाची कमतरता नसते आणि ती अ‍ॅनिमियाच्या आजारापासून दूर राहते. पोहे खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. लोह शरीराच्या पेशींना ऑक्सिजन पुरवतो.

मधुमेहावर गुणकारी

मधुमेहींसाठी पोहे खूप फायदेशीर आहे. मधुमेही व्यक्तीने पोहे खाल्ल्यास भूक कमी होते आणि बीपीची पातळीही योग्य राहते. पोह्यांच्या एका प्लेटमध्ये २४४ कॅलरीज असतात.

भरपूर पोषक तत्त्वे

अनेकदा घरांमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या मिसळून पोहे तयार केले जातात. पोह्यातील भाज्यांचे सेवन केल्याने शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर पुरेशा प्रमाणात मिळतात.

रात्रीची नखे कापणे का मानले जाते अशुभ? यामागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण

कार्बोहायड्रेटचा समृद्ध स्रोत

पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सही चांगल्या प्रमाणात आढळतात. कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देते आणि तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.

पोटाच्या समस्या दूर करते

जर तुमच्या पोटात काही समस्या असेल तर पोह्याचे सेवन तुमच्यासाठी चांगले राहील. हे पचण्याजोगे आहे. पोटाच्या रुग्णांना डॉक्टर पोहे खाण्याचा सल्ला देतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)