जर झोपेच्या सवयी अस्वाभाविक असतील तर वेळीच सावध व्हा. कारण, जे लोक कमी झोप घेतात आणि ज्यांना चांगली झोप लागत नाही अशा व्यक्तिंच्या मेंदूमध्ये अपायकारक प्रथिने तयार होवून त्या व्यक्तिंना स्मृतीभ्रंश होण्याची दाट शक्यता असल्याचे एका नव्या अभ्यासामधून समोर आले आहे.    
अपूरी झोप आणि निद्रानाश यामुळे मेंदूच्या स्वाभाविकतेमध्ये बदल होतात व स्मृतीभ्रंश बळावतो असा दावा या अभ्यासावर कामकरणाऱ्या संशोधकांनी केला आहे.    
मेंदूमध्ये पिष्टाभ-बीटा हा अपायकारक द्रव तयार होतो. हा द्रव स्मृतीभ्रंशाला निमंत्रण देणारा असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.      
बाल्टीमोर स्थित ‘द जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ या संस्थेचे अदाम पी स्पिरा व त्यांच्या सहकारी संशोधकांनी एकूण ७० जणांच्या बद्दल माहिती गोळा केली. यामध्ये कमाल वय ७६ असलेल्या काही व्यक्ती होत्या.
“या अभ्यासामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्तींच्या झोपेच्या सवयी पडताळण्यात आल्या. यामध्ये सात आणि पाच तास झोप घेत असल्याचा दावा करणारांची संख्या मोठी होती. निद्रानाश व कमी झोप घेणाऱ्यांच्या मेंदूमध्ये पिष्टाभ-बीटा द्रव तयार होत असल्याचे समोर आले,” असे स्पिरा म्हणाले.
‘जामा न्यूरोलॉजी’ या नियतकालीकामध्ये हा अभ्यास प्रसिध्द करण्यात आला आहे.       

Story img Loader