फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांच्या ग्लोबल देसी या प्रसिद्ध फॅशन ब्रॅण्डने नुकतेच पहिल्यांदाच सेंटची सिरीज लाँच केली आहे. अनिता डोंगरे या प्रसिद्ध मराठमोळ्या फॅशन डिझायनरचा फॅशन ब्रॅण्ड फार प्रसिद्ध आहे. ही सेंटची सिरीज फॅशन ब्रॅण्ड ‘अँड’ आणि ‘ग्लोबल देसी’ सह ‘अजमल परफ्युम’ यांच्या सहयोगाने तयार केली गेली आहे. ग्लोबल देसी हा भारतातील तरुण उर्जेशी प्रेरित, कलरफुल असा ब्रॅण्ड आहे. तर अँड हा समकालीन भारतीय महिलांसाठी अद्ययावत जागतिक शैली असलेले कपडे बनवतो. अजमल परफ्युम ही जुनी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख असणारी कंपनी आहे.
कशी तयार केली सेंटची सिरीज?
दोन्ही ब्रॅण्ड्स आणि अजमल समूहाने, ब्रॅण्ड्सच्या ६०० हून अधिक निष्ठावंत ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे सेंटची सिरीज तयार केली आहे. भारतभरातील स्टोअर्समध्ये या सिरीजमधील ८ सेंट उपलब्ध आहेत. अँड हा ब्रॅण्ड एक स्वतंत्र व आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आहे, तर ग्लोबल देसी हा ब्रॅण्ड पर्यटन व कलेवरील प्रेमाच्या छटा दाखवतो; ब्रॅण्ड्सच्या या वैशिष्ट्यांना अधिक उठाव देणारी सेंट आहेत.
सेंटची वैशिष्ट्य काय आहेत?
‘अँड’चे सेंट फ्लुइड सिलोवेटस, मऊ रंगांकडे स्वतंत्र, आत्मविश्वास असलेल्या महिलांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. कपड्यांच्या अनुषंगाने, यामध्ये नाजूक फुलांचा मोहक गंध आहे. या सिरीजमध्ये ४ इओ डी सेंट आणि मिस्ट सेंट आहेत. ‘ग्लोबल देसी’ सेंटमध्ये बाईचे मुक्त-उत्साही, मोहक, रहस्यमय आणि स्वतंत्र हे लक्षात घेऊन ४ इओ डी सेंट आणि ४ सेंट मिस्ट यांचा समावेश आहे.
“अँड आणि ग्लोबल देसी हे विकसनशील भारतीय महिलेसाठी अॅक्सेसेबल, सशक्तीकरण आणि सर्वसमावेशक अशी फॅशन तयार करण्याचे लक्ष्य ठेवत आहेत. अद्वितीय आणि दर्जेदार सेंट तयार करण्यासाठी, अजमल परफ्युम सारख्या बाजारातील प्रसिद्ध आणि मोठ्या कंपनीसह भागीदारी करणे त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. ” असं हाऊस ऑफ अनिता डोंगरे ची चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर अनिता डोंगरे सांगतात.