नवी दिल्ली : भविष्यात एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता किती आहे, हे सांगणे आता शक्य आहे. ही किमया कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हृदयाच्या ‘एमआरआय’द्वारे साधता आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृदयाचा आकार गोल असलेल्या व्यक्तींना अधिक धोका : कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार हृदयविकाराचा धोका किती प्रमाणात आहे, हे निदान करणे शक्य आहे. हृदयाचा आकार गोल असलेल्या व्यक्तीला हृदयाच्या मांसपेशींच्या आजाराचा धोका ४७ टक्के अधिक असतो, असेही या संशोधनामुळे स्पष्ट झाले. या आजारात मांसपेशी कठीण होतात. त्यामुळे रक्ताभिसरणात समस्या निर्माण होते. यामुळे अशा रुग्णांना भविष्यात हृदयविकार होण्याची शक्यता असते.

३८ हजार ८९७ जणांवर संशोधन : या संशोधनासाठी ३८ हजार ८९७ जणांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले होते. त्याचे विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणाच्या आधारे हृदयाचा आकार गोल असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराची शक्यता अधिक असते, असा निष्कर्ष काढण्यात आला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हृदयाचा आकार कोनसारखा असतो, परंतु त्याचा आकार गोल असेल तर हृदयावर अधिक दबाव आहे, याबाबत संकेत मिळतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possible to understand health status from the size of the heart zws
Show comments