Post Diwali Detox Tips In Marathi : सणासुदीत कधी मिठाई, कधी तेलकट पदार्थ अगदी उत्साहाने, बिनधास्त खाल्ले जातात. त्यानंतर मात्र काही दिवसांनी हेच खाल्लेले अन्नपदार्थ आरोग्यास हानी पोहोचवण्यास सुरुवात करतात, जे काही दिवसांनी अपचनाचे कारण ठरतात. पचनसंस्थेतील अडथळ्यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे तर होतेच; पण त्याचबरोबर पोटातील चरबीही वाढते. एकामागून एक येणारे सण आणि त्याच्या उत्साहात प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने शरीरात जीवनसत्त्वे, खनिजांची कमतरता वाढते. अशा परिस्थितीत सणासुदीनंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि पचनशक्ती वाढविण्यासाठी काही खास पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या मते, मजबूत पचनसंस्थेसाठी, ८०-२० नियम किंवा पॅरेटो प्रिन्सिपलचे पालन करा. त्यामुळे शरीराचा समतोल राखता येतो. म्हणजेच आहारात ८० टक्के पौष्टिक अन्न आणि २० टक्के प्रक्रिया केलेले अन्न असावे; जेणेकरून आम्लपित्त आणि अन्न विषबाधा टाळता येईल.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

सणासुदीनंतर शरीर डिटॉक्स करण्याच्या पाच टिप्स खालीलप्रमाणे (Post Diwali Detox Tips) :

१. प्रो-बायोटिक्सचे सेवन (Consume probiotics) :

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, प्रो-बायोटिक्सचे सेवन केल्याने शरीरातील प्रथिने आणि जीवनसत्त्वांचे शोषण वाढते. त्याशिवाय यातील गुड बॅक्टेरिया आतड्यातील मायक्रोबायोटाचे प्रमाण वाढवतात आणि यामुळे मायक्रोबायोटा संतुलित ठेवता येतो. तसेच, कोलनची पीएच पातळी कमी होऊ लागते; ज्यामुळे आतड्याची हालचाल नियमित होते. त्यासाठी दही, चीज, इडली, लोणचे, लस्सी यांचा आहारात समावेश करा.

२. फायबरयुक्त आहार घ्या ( Take fiber-rich diet ) :

सतत हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने शरीराला फायबर्स मिळतात. आहारात त्यांचे प्रमाण वाढवल्याने पचनसंस्था संतुलित राहतेच; पण वजन कमी होण्यासही मदत होते. फायबर्सच्या मदतीने आपली भूक नियंत्रणात राहतो आणि त्यामुळे म्यूकस वॉलचे (mucus wall ) संरक्षण होऊ शकते. परिणामत: बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनसंस्था निरोगी राहते. म्हणून आपल्या आहारात सफरचंद, नाशपाती, बीन्स, ब्रोकोली, बेरी, ॲव्होकॅडो, नट्स आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.

हेही वाचा…Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा

३. शरीराला हायड्रेट ठेवा (Keep the body hydrated) :

पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, बद्धकोष्ठता होऊ शकते. पोषणतज्ज्ञांच्या मते, पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. त्यामुळे शरीरातील खनिजांची कमतरता भरून काढली जाते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत मिळते. साध्या पाण्याव्यतिरिक्त आल्याचा चहा, पुदिन्याचे पाणी व हळदीचे दूध यांसह आरोग्यदायी पेये पिण्यास सुरुवात करा.

४. व्यायाम (Exercise) :

शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी दररोज बायकिंग, जॉगिंग, टेनिस, सायकलिंग, उच्च तीव्रतेचा व्यायाम (हाय इंटेसिटी एक्सरसाइज) आणि २० ते ३० मिनिटे कार्डिओ करा. त्यामुळे पोट निरोगी राहते. स्नायूंचे क्रॅम्प दूर होतात आणि नियमित व्यायामाने सणासुदीनंतर शरीरातील कॅलरीज वाढणे टाळता येते.

५. तेल, साखरेचे सेवन टाळा (Avoid consumption of oil and sugar) :

गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. त्याशिवाय गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे आम्लपित्त (acid reflux) होऊ शकते. जरी साखर शरीराला तात्पुरती ऊर्जा देत असली तरी तिचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने पोट फुगणे, पचनाची अडचण आणि आम्लपित्त होऊ शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आतड्यांसंबंधी अडथळा आणते आणि त्यामुळे आतड्यांतील मायक्रोबायोटा डिस्बिओसिसचा धोका वाढतो. या कारणामुळे रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम होऊन संक्रमणाचाही धोका वाढतो.