पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण इतर बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे मानले जाते. तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल, तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी अधिक चांगल्या असू शकतात. आज तुमच्यासाठी अशीच एक स्कीम घेऊन आलो आहोत, यात तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम
पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही सरकार समर्थित योजना आहे. कमी पैसे टाकून या योजनेत खातं उघडता येते. या योजनेत तुम्ही १०० रुपये देखील गुंतवू शकता. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करता येईल. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. या योजनेत पाच वर्षांसाठी खाते उघडता येते. दुसरीकडे, बँका सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी कालावधीसाठी ऑफर करतात. प्रत्येक तिमाहीत, त्यात जमा केलेल्या पैशावर व्याज (वार्षिक दराने) मोजले जाते. ते तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जमा केले जाते.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
ipo investment
Initial Public Offer: गुंतवणूकदारांचा ‘आयपीओ’द्वारे २०२४ मध्ये विक्रमी १.२२ लाख कोटींचा भरणा
sensex today (3)
दिवाळी ते दिवाळी…वर्षभरात गुंतवणूकदार झाले दीड लाख कोटींनी श्रीमंत!
Thieves stole cash from women bags on Lakshmi Street crime news Pune news
लक्ष्मी रस्त्यावर चोरट्यांचा सुळसुळाट; महिलांच्या पिशवीतून रोकड चोरी
Opposition from the State Public Works Department Contractors Association to the Governor Chief Minister Deputy Chief Ministers regarding the payment of arrears Nagpur news
मुख्यमंत्री, उपमख्यमंत्र्यांना काळी पणती, काळे आकाश कंदील पाठवणार

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये तुम्हाला किती व्याज मिळेल?
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्किममध्ये तुम्हाला बँकेपेक्षा जास्त रिटर्न मिळेल. १ एप्रिल २०२० पासून ठेवींवर ५.८% व्याजदर दिला जात आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत त्यांच्या सर्व लहान बचतींसाठी व्याज दर ठरवते.

Advice: ३१ डिसेंबरपूर्वी ही काम पूर्ण करा; अन्यथा अडचणीत होईल वाढ

कसे मिळणार १६ लाख रुपये?
जर तुम्ही १० वर्षांच्या पोस्ट ऑफिस आरडी योजने दर महिन्याला १० हजार रुपये गुंतवले. तर आपल्याला ५.८ टक्क्यांनी १६ लाख रुपये मिळतील.

  • प्रत्येक महिन्याला १०,००० रुपये
  • व्याज ५.८ टक्के
  • १० वर्षानंतर मॅच्युरिटी रक्कम १६,२८,९६३ रुपये

आरडी खात्यात नियमितपणे पैसे जमा केले पाहिजेत. जर तुम्ही गुंतवण्यात खंड पाडला तर तुम्हाला एक टक्के मासिक दंड आकारला जाईल आणि चार हप्ते चुकल्यानंतर तुमचे खाते बंद केले जाईल. या योजनेअंतर्गत कर सूट देखील दिली जाते आणि जर ठेव ४०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर १०% वार्षिक कर लागू होतो. आरडीवर मिळवलेले व्याज करपात्र आहे, परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर नाही.