स्वयंपाक करणे एक कौशल्याचे काम आहे. स्वयंपाक करताना आईने सांगितलेल्या काही टिप्स आपला काम खूप सोपे करू शकतात. स्वयंपाक करताना तुमचा वेळ वाचवण्यासाठी आपण नेहमीच काही ना काही जुगाड किंवा टिप्स शोध असतो. आज अशीच एक भन्नाट ट्रिक बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तसेच या टिप्सबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे तेही जाणून घेणार आहोत. अनेकदा फ्लॉवर किंवा बटाटा यांसारख्या सुक्या भाज्या शिजवताना स्वयंपाक घरात बराचवेळ उभे राहावे लागते. काही भाज्या पटकन शिजत नाही. अशावेळी गॅस मंद आचेवर ठेवून तुम्ही कढई ताट ठेवून झाका आणि झाकणावर पिण्याचे पाणी ओता जेणेकरून तुमची भाजी झटपट शिजण्यास मदत होईल.
तुम्हाला फक्त झाकणावर थोडे पाणी टाकायचे आहे जे सहसा भाजी झाकण्यासाठी वापरले जाते. तज्ञांच्या मते, हे तंत्र केवळ सुक्या भाज्य छान आणि एकसमान शिजवते आणि त्याचीर चव देखील वाढवते.
सुक्या भाज्या शिजवताना भांड्याच्या झाकणात किंवा कढईत पाणी घालणे हे स्वयंपाकाच्या भांड्यात वाफ तयार करण्यासाठी वापरले जाणारे स्वयंपाकाचे तंत्र आहे, असे शेफ शिप्रा खन्ना यांनी सांगितले. “ही वाफ ओलावा निर्माण करण्यास मदत करते, ज्यामुळे भाज्या समान रीतीने शिजतात आणि तसेच कढईमध्ये वाफ तयार करते आणि भाजी तळाशी चिकटण्यापासून टाळते. त्यामुळे भाजीची चव देखील वाढते. एकूणच, हा किचन हॅक जेवणाची चव वाढवण्याची आणि झटपट भाजी शिजवण्याची खात्रीपूर्ण पद्धत आहे,” असे खन्ना यांनी सांगितले.
याबाबत सहमती दर्शवत जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ञ सुषमा पीएस यांनी द इंडियन एक्सपर्टला सांगितले की, ” कढईत वाफ निर्माण झाल्यामुळे भाजी जलद आणि अधिक समान रीतीने शिजवण्यास मदत करते. भाजीपाला वाफवताना किंवा त्यात ओलावा आणि पोषक द्रव्ये टिकून राहतील याची खात्री करायची असेल तर ही पद्धत उपयोगी पडते.”
हेही वाचा – “नवरा सरकारी नोकरीवालाच पाहीजे” पुण्यात तरुणानं अशा अपेक्षा करणाऱ्यांना दिलं चोख उत्तर
तज्ञांचा आग्रह आहे की, स्वयंपाक करण्याचा हा एक आरोग्यदायी मार्ग आहे कारण पाण्याची वाफ जास्त तेल न वापरता भाज्या मऊ करण्यास मदत करते. झाकण ठेवल्याने भांड्यात ओलावा आणि उष्णता टिकून राहण्यास मदत होते, ज्यामुळे स्वयंपाकाचा वेग वाढतो आणि भाज्या कोरड्या होण्यापासून वाचू शकतात. झाकण नसेल तर भाजी सुकी होऊन कढईला चिकडू शकते. ” सुषमाने indianexpress.com ला सांगितले.
काय लक्षात ठेवावे?
कढईच्या झाकणावर पाणी घालताना तुम्ही सावध असले पाहिजे कारण जास्त पाणी घातल्या भाजी जास्त शिजू शकते. “भाज्या वाफवण्याऐवजी जास्त शिजल्या जाऊ शकतात, जे जास्त पाण्याच्या वापरामुळे होते. साधारणपणे सांगायचे तर, तुम्हाला वाफेचे उत्पादन करण्यासाठी पुरेसे पाणी घालायचे आहे,”असे सुष्मा यांनी सांगितले.