Iron deficiency anemia during pregnancy: आई बनणे ही प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर गोष्ट असते. गर्भधारणेनंतरचा ९ महिन्यांचा काळ सर्वात महत्वाचा असतो. हा काळ अत्यंत संवेदनशील आणि काही बाबतीत आरोग्याच्या दृष्टिकोनातून कठीण असतो. या काळात महिलांच्या आरोग्यात अनेक चढ-उतार होत असतात. या काळात महिलेला तिच्या आरोग्याची अधिक आणि चांगली काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भधारणेनंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा परिस्थितीत शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर काही औषधे आणि पौष्टिक पूरक आहार घेण्याचा सल्ला देतात. त्यात आयरन देखील असते. आपल्या समाजात गर्भधारणेबाबत अनेक समज गैरसमज आहेत. गरोदरपणात आयरन घेतल्याने बाळाच्या रंगावर परिणाम होतो असा अनेक महिलांचा गैरसमज असतो. आज या लेखात आपण जाणून घेणार आहोत की या दाव्यात किती तथ्य आहे आणि आयरनचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो.

गर्भधारणे दरम्यान आयरन का दिले जाते?

पुण्यातील सहेधरी स्पेशालिटी हॉस्पिटल येथील आयव्हीएफ तज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक यांच्या मते, आयरन केवळ गरोदरपणातच नाही तर सर्वसाधारणपणे काही शारीरिक कार्यांसाठी देखील आवश्यक आहे. हे ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींमधील एक प्रथिने आहेत. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आयरन खूप महत्वाचे आहे.

गरोदरपणात लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होण्याचा धोका असतो. याला सामान्यतः अॅनिमिया म्हणतात. म्हणूनच डॉक्टर गर्भधारणेदरम्यान आयरनची कॅप्सूल घेण्याची शिफारस करतात. यामुळे आईची हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहते आणि बाळाला ऑक्सिजनही चांगला मिळतो.

( हे ही वाचा: उंचीनुसार महिलांचे वजन नेमके किती असावे? पाहा शासनाने जाहीर केलेला ‘हा’ सोपा तक्ता)

आयरनमुळे बाळ काळे होते का?

प्रख्यात आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक यांनी सांगितले की, गरोदरपणात आयरनच्या गोळ्या घेतल्याने बाळ काळे होत नाही. या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खाव्यात. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे मुदतपूर्व प्रसूती होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयरनच्या कमतरतेमुळे बाळाला त्रास होतो का?

डॉ. पुराणिक यांच्या मते, गरोदरपणात आईच्या शरीरात आयरनचे योग्य प्रमाण असणे फार महत्वाचे आहे. आईच्या शरीरात आयरनची कमतरता मुलाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या विकासावर परिणाम करू शकते. अहवालानुसार, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात भारतातील महिलांचे हिमोग्लोबिन कमी असते.

लाल रक्तपेशींसाठी आयरन आवश्यक आहे

डॉ. पुराणिक यांनी स्पष्ट केले की, गर्भधारणेदरम्यान शरीरात भरपूर रक्त तयार होते, रक्त तयार करण्यासाठी लाल रक्तपेशींची आवश्यकता असते. जे आयरनच्या मदतीने तयार केले जाते. सुरक्षित प्रसूतीसाठी चांगल्या प्रमाणात हिमोग्लोबिनची आवश्यकता असणे गरजेचे आहे. सिझेरियन डिलिव्हरी असो की नॉर्मल डिलिव्हरी, त्या काळात खूप रक्त वाहते. अशा वेळी तुमची हिमोग्लोबिन पातळी आधीच कमी असल्यास, प्रसूती धोकादायक आणि प्राणघातक असू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnancy does taking iron capsules during pregnancy really affect the colour of the baby gps