तुम्ही प्रेग्नंट आहात आणि याचं तुम्हाला टेन्शन येतंय का? प्रेग्नंसीमध्ये निरोगी कसं राहायचं हे तुम्हाला समजत नाही का? जर होय, तर तुम्ही बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानकडून मिळालेल्या या टिप्सची मदत घेऊ शकता. तसंच करीनाने तिच्या ४० व्या वयातील प्रेग्नंसीमध्ये फिट राहण्यासाठी आणखी काय काय केलं हे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री करीना कपूरने वयाच्या ४० व्या वर्षी मुलगा जेहला जन्म दिला. करीना ३६ वर्षांची असताना तिला पहिला मुलगा तैमूर झाला. उशीराने होत असलेल्या प्रेग्नेंसीबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल स्त्रिया अनेकदा निराश होतात. पण करिनाचा असा विश्वास आहे की, या गोष्टीचा दबाव महिलांनी कधीही घेऊ नये. करिनाचे म्हणणं आहे की, तिने आई होताना कधीही तिच्या वयाचा विचार केला नाही.

करीना कपूरने ‘रॅगिंग पॅरेंट्स विथ मानसी झवेरी’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात तिने महिलांच्या ४० व्या वयात होणाऱ्या प्रेग्नंसीबाबत काही टिप्स शेअर केल्या आहेत. यावेळी बोलताना करीना म्हणाली, ‘मी मुलासाठी कधीही प्लॅनिंग केलं नव्हतं. कारण त्यावेळी मी ३६ वर्षांची होते आणि माझे बायोलॉजिकल क्लॉक देखील इशारा देऊ लागलं होतं. पण तरीही, मी मुलांसाठी प्लॅनिंग केलं नाही. कारण माझा असा विश्वास होता की, मी सैफसोबत प्रेमाचं नात्याने लग्न केलं होतं. पण तेव्हा मला वाटलं की मला मुलं असावीत. मी उशीराने होत असलेल्या गरोदरपणाचा दबाव कधीच घेतला नाही, मी नेहमी माझ्या कामाचा विचार केला.”

करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचा जन्म याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झाला. गरोदरपणातही करीना काम करत होती. प्रेग्नेंसीमध्येही काम करण्याबद्दल तिने काही गोष्टी शेअर केल्या आहेत. करीना म्हणाली, “मी माझा प्रेग्नेंसी पीरियड खूप एन्जॉय केला. चित्रपटांमध्ये काम केलं, अनेक कार्यक्रमांमध्ये गेले, शोचा भाग बनले. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता.”

करीना कपूरप्रमाणेच हल्ली अनेक महिला उशीरा गर्भधारणेचा मार्ग निवडतात. नोकरदार महिलांमध्ये हा ट्रेंड जास्त आहे. वयाच्या ४० व्या वर्षी किंवा त्यानंतर गर्भवती झाल्यास तिने या गोष्टींची काळजी घ्यावी.

वयानुसार स्त्रीच्या ओव्हुलेशनमध्ये अंड्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होते. या वयात बीजांडाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही कमी होते. त्यामुळे अशा स्थितीत स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बीजांडातून बाहेर पडणाऱ्या अंड्याचा दर्जा तपासून घ्या.

गरोदरपणात तुमच्या डॉक्टरांना नियमित भेट द्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हलका व्यायाम करा. जेवणाची विशेष काळजी घ्या आणि तणाव घेऊ नका. जर तुम्ही ४० नंतर गरोदर राहण्याचा विचार करत असाल तर ३०-३५ व्या वर्षी तुमची अंडी फ्रीज करा. असं केल्याने मुलांमधील जनुकीय आजार टाळता येऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnancy news in marathi kareena kapoor says ladies should not take pressure of late pregnancy know what to do in late pregnancy prp