Monkeypox Virus: माकडपॉक्सच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या ४ झाली आहे. मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण दिल्लीत नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी केरळमध्ये तीन जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. तिघेही संयुक्त अरब अमिरातीहून परतले आहेत. त्याच वेळी, चौथ्या व्यक्तीने अलीकडच्या काळात परदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे दिल्लीतील एका व्यक्तीला घरी असतानाही मंकीपॉक्सची लागण कशी झाली हा चिंतेचा विषय आहे. सध्या सर्व बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सरकारने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विशेषतः, लहान मुले आणि गर्भवती महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असं सांगण्यात आलंय. तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास मंकीपॉक्सचा धोका वाढतो. मुले आणि गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो. याआधी १९७० मध्ये ७ वर्षांच्या लहान मुलामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

संशोधन काय सांगते

गर्भवती महिलांनाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन काँगोमध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये २१६ महिलांचा समावेश होता. या संशोधनात सहभागी असलेल्या ५ पैकी ४ महिलांचा गर्भपात झाला होता. त्याच वेळी, गर्भात वाढणाऱ्या मुलांमध्येही मांकीपॉक्सची लक्षणे आढळून आली. यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाही हा आजार होतो. यासाठी बाधित व्यक्तीपासून अंतर ठेवा. लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याची खात्री करा.

पाहा व्हिडीओ –

( हे ही वाचा: Heart Health: हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दिवसातून किती वेळ चालणे आवश्यक आहे? जाणून घ्या)

गर्भवती महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खा.
  • रोज हळदीचे दूध प्या.
  • अन्नपदार्थ शेअर करू नका. तसेच, ब्रश, टूथपेस्ट, टॉवेल इत्यादी गोष्टी शेअर करू नका.
  • बाधित व्यक्तीपासून अंतर ठेवा. यासाठी सर्दी, खोकला आणि मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा.
  • घराबाहेर मास्क लावा. याच्या मदतीने तुम्ही कोरोना विषाणूचा संसर्ग टाळू शकता.

Story img Loader