Chandra Grahan 2022 Precautions Pregnant Women: चंद्रग्रहण ही एक खगोलिय घटना असली तरी त्याला धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की, या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. तसेच यावेळी मंदिरात पूजा करण्यासही मनाई असते. या काळात गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. आज ८ नोव्हेंबर २०२२ ला या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आहे. दुपारी २ वाजून ४१ मिनिटांला चंद्रग्रहण सुरू होईल तर सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांला चंद्रग्रहण समाप्त होईल. हे चंद्रग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. खरंच या चंद्रग्रहणाचा गर्भवती महिलांवर परिणाम होतो काय आणि त्यांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी कशी काळजी घ्यावी ?

  • धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना खोलीत किंवा घरात थांबण्याचा सल्ला दिला जातो. कारण असे मानले जाते की, चंद्रग्रहणाचा गर्भावर वाईट परिणाम होतो. ग्रहणाच्या प्रभावामुळे मुलांमध्ये शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व येऊ शकते. यामुळे गरोदर महिलांना ग्रहण काळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. या समजुती आणि दंतकथा संस्कृतींमध्ये खोलवर रुजलेल्या आहेत आणि अनेकांनी त्यांना खोडून काढण्याचा प्रयत्नही केला आहे. तथापि, आजपर्यंत काही लोक या परंपरांचे पालन करतात.
  • धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. असे मानले जाते की, चंद्रग्रहणातून बाहेर पडणारे किरण अन्न दूषित करतात. यामुळे अन्न पदार्थ न खाता नारळ पाणी पिण्याचा सल्ला या काळात दिला जातो.
  • धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये. कारण याकाळात दूषित गोष्टी बाहेर पडतात. झोपेत गर्भवती महिलेला किंवा बाळाला काही त्रास झाला तर तो कळणार नाही. त्यामुळे चंद्रग्रहणात महिलांना न झोपण्याचा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा : Happy Kartik Purnima 2022 Marathi Wishes: कार्तिक पौर्णिमेनिमित्त आपल्या प्रियजनांना खास मराठीतून द्या ‘या’ शुभेच्छा!

धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे?

  • ज्योतिषशास्त्रानुसार गरोदर महिलांनी ग्रहणाच्या वेळी तोंडात तुळशीची डाळ ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुतीचा पाठ करावा. याचा नकारात्मक शक्तींवर परिणाम होत नाही. गरोदर महिलांनी ग्रहणकाळात त्यांच्या प्रमुख देवतेचा मंत्र जप करावा. यामुळे गर्भातील बाळ निरोगी आणि सुरक्षित राहते.
  • गर्भवती महिलांनी ग्रहण काळात इष्टदेवी देवतांचे नामस्मरण करावे. ग्रहण सुटल्यानंतर गंगाजल किंवा पाण्यात गोमुत्र टाकून स्नान करावे.

…आणि कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत

  • चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ज्यात चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते आणि सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही. शास्त्रामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाला महत्त्व असून गर्भवती महिलांनी काय करायला हवे किंवा करू नये याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाहता याला कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. गरोदर स्त्रियांनी चंद्रग्रहणाच्या वेळेस अजिबात झोपू नये असे म्हटले जाते मात्र या गोष्टीला देखील कोणताही वैज्ञानिक आधार नसून हा एक गैरसमज आहे.
  • ग्रहणादरम्यान पृथ्वीवरील वातावरणात काही प्रमाणात फरक पडतो. पण त्याचा अर्थ काही खाऊ पिऊ नये, असा होत नाही. तसे केल्यास गर्भवती महिलेच्या रक्तातली साखर कमी होऊन चक्कर येते, थकवा येतो. गर्भाच्या रक्तातली साखर ही थेट आईच्या शुगरलेव्हलवर अवलंबून असते. बाळाचा जन्म आणि ग्रहण याचा शास्त्रीय काहीही संबंध येत नाही.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant women should take care during lunar eclipse pdb