अकाली जन्मलेल्या बाळांना भविष्यात ह्रदयविकार होण्याची दाट शक्यता असते, अशी माहिती एका संशोधनातून पुढे आलीये. अकाली जन्मलेल्या बाळांची वाढ होऊ लागल्यानंतर त्यांच्यामध्ये ह्रदयविकार उदभवण्याची शक्यता अधिक असते, असेही संशोधनात दिसून आले.
संशोधनामध्ये अकाली जन्मलेल्या १०२ बालकांचा जन्मापासून त्यांच्या वयाची २० वर्षे पूर्ण होईपर्यंत अभ्यास करण्यात आला. त्याचवेळी सर्वसाधारण मुदतीत जन्मलेल्या १३२ बालकांच्या वाढीचाही संशोधकांनी अभ्यास केला. त्यातून असे दिसून आले की अकाली जन्मलेल्यांना तारुण्यामध्ये ह्रदयविकार सुरू होण्याची शक्यता असते. यापैकी काही जणांचे ह्रदयाचे पंपिग कमी असते तर काही जणांच्या ह्रदयाच्या झडपेचा आकार कमी असतो, असे आढळून आले. अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सध्याच्या काळात एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के नागरिक हे अकाली जन्मलेले असतात. त्यापैकी काही जणांना ह्रदयविकाराचा तीव्र त्रास असल्याचेही संशोधनात आढळले, असे ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक पॉल लीसन यांनी सांगितले. लीसन यांच्या नेतृत्त्वाखालीच हे संशोधन करण्यात आले.
अकाली जन्मलेल्या बालकांना भविष्यात ह्रदयविकाराची शक्यता
अकाली जन्मलेल्या बाळांना भविष्यात ह्रदयविकार होण्याची दाट शक्यता असते, अशी माहिती एका संशोधनातून पुढे आलीये.
First published on: 14-08-2013 at 06:20 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premature babies at higher risk of heart disease