घटस्फोचामध्ये आर्थिक विभागणी हा सर्वात महत्वाचा घटक असतो. हे एक भावनिक दु:ख असल्यामुळे लोक घटस्फोटाच्या महत्वपूर्ण आर्थिक पैलूंकडे कदाचित दुर्लक्ष करु शकतात. मात्र त्याचे परिणाम समजण्याएवढे सहज नसू शकतात. पण तुमच्या आर्थिक बाजूला तयार करणे कायदेशीर सल्ल्याची अपेक्षा करण्याएवढेच महत्वाचे असते. तुम्ही लक्ष द्यायला हवे असे मुद्दे इथे संक्षेपात दिलेले आहेत
तुमच्या लग्नाचे नियमन करणारा कायदा
भारतामध्ये प्रत्येक धर्मामध्ये लग्नाच्या आणि तुमच्या एकमेकांच्या उत्पन्नावरील अधिकारांच्या संदर्भात कायदा असतो त्याचप्रमाणे विशिष्ट कायद्याप्रमाणे संपत्ती परिभाषित केलेली असते. जर तुमच्या लग्नाची विशेष लग्न अधिनियमाच्या अन्वये नोंदणी झाली असेल तर पोटगी किंवा देखभालीच्या खर्चाला देण्याच्या जोडीदाराच्या क्षमतेला सिध्द करण्याची जवाबदारी दावा करणा-या व्यक्तीवर येते.
पोटगीचा फरक
साधारणपणे आपल्या जोडीदारावर आर्थिकदृष्ट्या अवलंबित असलेली स्त्री पोटगीसाठी पात्र ठरते, ज्यामुळे तिला तिच्या जोडीदाराप्रमाणे जीवनशैली जगण्याची मुभा मिळते. स्त्री आणि तिच्या नव-यामार्फत कमावल्या जाणा-या रकमेतली दरी मोठी असल्यास हे सत्य ठरते. जोडीदार एकरकमी पेमेंट किंवा देखभालीच्या स्वरुपातील मासिक तत्वावरील पेमेंटमध्ये पोटगीचा दावा करु शकतो. पोटगीचे आकारमान नव-याच्या उत्पन्न मिळवण्याच्या क्षमतेच्या, संपत्ती, दायित्वे आणि जीवनमानाच्या दर्जावर ठरवले जाते.
मुलाची देखभाल
मुलांचे हित ही आई-वडिल दोघांची जबाबदारी असली तरी, ज्या जोडीदाराकडे मुलांचा अधिकार असतो, त्याला एकरकमी स्वरुपात किंवा मुलांच्या जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये भागांमध्ये महागाईला समायोजित करुन पेमेंट मिळते.
आईवडिल म्हणून पालकांकडून देखील मुलाच्या नावे गुंतवणूक करता येऊ शकते. परंतु मालमत्तेसारख्या गुंतवणूकीसाठी जरी आईकडे मुलांचा कायदेशीर अधिकार असला तरी, वडिलांना पालक समजले जाते. वडिलांच्या अनुपस्थितीत केवळ आईलाच पालक समजले जाते, ही संज्ञा कायद्याद्वारे वरवर परिभाषित करण्यात आली आहे.
जर तुम्हाला घटस्फोटामुळे तुमच्या मुलांच्या हितासाठी जोखीम असण्याचा संशय आल्यास तुम्ही मुलांना लाभार्थी बनवून एक ट्रस्ट स्थापन करु शकता आणि त्यांच्यासाठी संपत्ती आणि गुंतवणूकी राखून ठेवू शकता.
संयुक्त वित्त आणि संपत्ती
नजीकच्या काळातील प्रगतीनुसार दिल्ली उच्च न्यायालयाने बेनामी मालमत्ता अधिनियमाच्या निवारणात सुधारणा केल्या आहेत, ज्यायोगे पत्नीमार्फत तिच्या नावावर असलेल्या कोणत्याही संपत्तीवरील तिच्या अधिकाराला आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे जर पती त्याच्या पत्नीच्या नावावरील मालमत्तेचे पैसे त्याने दिले आहेत, हे सिध्द करु शकला तर तो देखील भागाचा दावा करु शकतो. पण स्त्रीधन म्हणजे पत्नीला लग्नाआधी, दरम्यान किंवा नंतर दिलेल्या कोणत्याही भेटवस्तू केवळ तिच्याच मालकीच्या असतात.
जेव्हा मालमत्तेसारख्या संयुक्त संपत्तीचा विचार केला जातो तेव्हा कायदा प्रत्येक जोडीदाराचा खरेदीतील हिस्सा मूल्यांकन करुन त्याला त्याप्रमाणे मालकी देतो. पण संयुक्त बॅंक खात्याच्या स्वरुपात दोन्ही जोडीदारांना एकसमान अधिकार असतात, त्यामध्ये प्रत्येकाने दिलेले योगदान गौण मानले जाते.
आर्थिक उद्दिष्टे
अखेरीस शेवटची नसलेली बाब म्हणजे तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्देशांसाठी निरंतर काम करावे लागते. घटस्फोटानंतर, तुम्हाला दुहेरी उत्पन्नावरुन एकेरी उत्पन्नावर यावे लागू शकते. त्यामुळे तुमच्या वित्ताचे मूल्यांकन करुन शक्य तिथे खर्च कमी करणे आणि तुमच्या व्यक्तीगत संपत्तीला वाढवण्यासाठी पुन्हा गुंतवणूक करणे महत्वाचे असते. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पोटगी किंवा मुलांच्या देखभालीसाठी एकरकमी रक्कम मिळाली असेल तर महगाईला तोंड देऊ शकणा-या परताव्याच्या खात्रीसाठी पैसे गुंतवणे हा एक उत्तम पर्याय आहे.
तुमच्या उद्देशांना लघु, मध्यम आणि दीर्घ कालावधीमध्ये विभागा आणि त्याप्रमाणे तुमच्या गुंतवणूकीचे नियोजन करा. तुम्हाला वाढलेल्या आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी काही मदत हवी असल्यास, तज्ञांचा सल्ला घ्या.
आदिल शेट्टी
सीइओ, बॅंकबझार