Pressure Cooker Repair: प्रेशर कुकर आपल्या किचनचा महत्त्वाचा भाग मानला जातो. कुकरमध्ये कित्येक पदार्थ तयार करणे सोपे असते. विशेषत: डाळ आणि खिचडी यामध्ये झटपट तयार होते ज्यामुळे गॅस आणि वेळीची बचत केली जाऊ शकते. पण कित्येकवेळा कुकर जुना झाल्यामुळे त्यात अपेक्षित प्रेशर तयार होत नाही. कुकरला देखील मेंटेनेंसची गरज असते. चला जाणून घेऊ या सोप्या टीप्स ज्यामुळे तुमचा कुकरमध्ये पूर्वीसारखा व्यवस्थित काम करेल. कित्येकदा आपल्या चूकीमुळे कुकर व्यवस्थित काम करत नाही ज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रेशर कुकरला कसे ठिक करावे?
वाप लीक होत असल्यास काय करावे –
कित्येकदा असे पाहायला मिळते की, जेव्हा तुम्ही अन्न शिजवता तेव्हा कुकरमध्ये झाकणाजवळ वाफ लीक होते. तुमच्या कुकरचे झाकण वाकडे झालेले असू शकते. अशा वेळी स्वत:च दुरुस्त करणे योग्य नाही कारण तुम्ही कोणी एक्सपर्ट नाही. त्यापेक्षा बाजारात जाऊन कोणत्याही मॅकॅनिककडून योग्य पद्धतीने दुरस्त करू शकता.
हेही वाचा – Kitchen Hacks: डाळ-तांदळाला किड लागली आहे का? ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, झटपट होईल साफ
कुकरमध्ये प्रेशर तयार होत नाही
जर कुकरमध्ये प्रेशर योग्य पद्धतीने तयार होत नसेल तर खूप समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी हे काम करावे लागेल की रबर काढून चेक करा आणि नीट पाहा की तो खराब झाला आहे. जर रबरला थोडासा जरी कट पडला असेल तर ही समस्या होऊ शकते. प्रत्येक २-४ महिन्यांमध्ये कुकरचा रबर बदलावा.
हेही वाचा – सुकलेले लिंबू फेकून देता असाल तर थांबा! Dried Lemonचे आहेत अनेक फायदे; कसा करावा वापर, जाणून घ्या ट्रिक
अन्न करपत असेल
जेव्हा तुम्ही कुकरमध्ये अन्न शिजवता तेव्हा ते तळाला चिकटण्याची शक्यता असते. कुकरमध्ये गरजेपेक्षा जास्त प्रेशर तयार होत आहे. जास्त प्रेशर धोकादायक ठरू शकते कारण यामध्ये कुकरचा स्फोट होऊ शकतो आणि मोठी दुर्घटना घडू शकतो. त्यासाठी मार्केटमध्ये जाऊन वेळीच कुकर दुरुस्त करून घ्या किंवा जुना कुकर वापरू नका. नवीन कुकर वापरा.