‘बजाज ऑटो’ने अ‍ॅव्हेंजरच्या सर्व मॉडल्स आणि पल्सर मालिकेतील अधिकांश बाइक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. 998 ते 4000 रुपयांची वाढ किंमतीत करण्यात आली आहे. कंपनीने बजाज 150 आणि अॅव्हेंजर 160 स्ट्रीटच्या किंमती 998 रुपयांनी वाढवल्या आहेत. तर, पल्सर 150 Neon च्या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, Dominar 400 ची किंमतही 10 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता या बाइकची किंमत 1.90 लाख रुपये झाली आहे. जाणून घेऊया अ‍ॅव्हेंजर आणि पल्सरच्या कोणत्या बाइकच्या किंमतीत किती वाढ –

4,000 रुपयांनी महागली Pulsar Neon
Pulsar Neon च्या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पहिले दिल्लीमध्ये Pulsar Neon ची एक्स-शोरुम किंमत 71,200 रुपये होती, आता ही किंमत 75,200 रुपये झाली आहे. तर, पल्सर 150 बाइक 998 रुपयांनी महाग झाली आहे. आधी Pulsar 150 ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 84,960 रुपये होती, आता ही किंमत वाढून 85,958 रुपये झाली आहे.

helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
bajaj housing finance ipo gets bids worth rs 3 25 lakh crore
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ‘आयपीओ’ला विक्रमी ३.२५ कोटींच्या बोली
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
job creation under modi government in 100 days
समोरच्या बाकावरुन : १०० दिवसांत बेकारीची शंभरी भरली नाहीच!
Maruti Jimny Car Sales Maruti Jimny Got Record Growth Of 5700 Percent In Exports Check Details
Maruti Jimny Car Sales: या कारने विक्रीच्या बाबतीत मोडला रिकॉर्ड; जाणून घ्या किती झाली विक्री
Employees right not to work after office hours What would Australias Right to Disconnect law look like
कार्यालयीन वेळेनंतर काम न करण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार… कसा असेल ऑस्ट्रेलियातील ‘राइट टू डिस्कनेक्ट’ कायदा?
Virat Kohli Jersey Sold For 40 Lakhs in auction
Virat Kohli : रोहित-धोनीच्या बॅटपेक्षा विराटच्या जर्सीला मिळाला अधिक भाव, केएल राहुलच्या लिलावात लागली तब्बल इतकी बोली

1,100 रुपयांनी महाग झाली Pulsar 180F –
Pulsar 150 Twin Disc च्या किंमतीत 999 रुपयांची वाढ झाली आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत आतापर्यंत 88,838 रुपये होती, पण किंमत वाढल्याने आता 89,837 रुपये झाली. तर, Pulsar 150 F च्या किंमतीत 1,100 रुपयांची वाढ झाल्याने ही बाइक आता 96,390 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Pulsar NS200 झाली 1,299 रुपयांनी महाग –
Pulsar NS200 च्या किंमतीत 1,299 रुपयांची वाढ झाली असून ही बाइक आता 1 लाख 14 हजार 355 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, Pulsar 200 F च्या किंमतीत देखील 1,299 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी ही बाइक आता 1,08,327 रुपयांना झाली आहे. तसेच, Pulsar NS160 ची किंमतही 1,101 रुपयांनी वाढली आहे. Pulsar NS160 ची दिल्ली एक्स-शोरुम किंमत आतापर्यंत 93 हजार 094 रुपये होती. आता ही बाइक 94 हजार 195 रुपयांमध्ये खरेदी साठी उपलब्ध असेल.

1,197 रुपये महाग झाली Avenger 220 Cruise –
बजाजची Avenger 220 Cruise बाइक 1,197 रुपयांनी महाग झाली आहे. 1 लाख 5 हजार 088 रुपये इतकी या बाइकची नवी किंमत आहे. तर, Avenger 160 Street च्या किंमतीत 998 रुपयांची वाढ झाल्याने ही बाइक 83 हजार 251 रुपये या नव्या किंमतीत खरेदी करता येणार आहे.