How To Make Priyanka Chopras De Tan Scrub : उन्हाळा येताच त्वचेच्या समस्या वाढू लागतात. चेहऱ्यावर चिकटपणा, सतत घाम येणे, त्वचा तेलकट दिसणे आणि सूर्याच्या किरणांमुळे टॅनिंग होण्यास सुरुवात होते. या टॅनिंगमुळे त्वचेवर घाण जमा झाल्यासारखे वाटते आणि त्वचेचा रंग काळवंडू लागतो. अशा परिस्थितीत, टॅनिंग दूर करण्यासाठी विविध प्रकारच्या क्रीमपेक्षा घरगुती उपायांचा उपयोग केला तर चांगला परिणाम दिसू शकतो. तर आज आम्ही जो तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत, जो स्वतः अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुद्धा शेअर केला आहे.टॅनिंग दूर करण्यासाठी हे स्क्रब घरी अगदी सहज तयार करता येते.

प्रियांका चोप्राचा डी-टॅन मास्क…

तर हा स्क्रब बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात बेसन घ्या आणि त्यात दही मिक्स करा. दही साधे असावे. आता या पेस्टमध्ये थोडा लिंबाचा रस, दूध, थोडी हळद, चंदन पावडर घाला आणि मिक्स करा. हे स्क्रब त्वचेवर घासून कोरडे होईपर्यंत ठेवा आणि नंतर धुवा. त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. हे केवळ चेहऱ्यावरच नाही तर हात आणि पायांवर देखील लावता येते.

बेसन हा एक्सफोलिएटर म्हणून काम करते. तर दूध आणि दही त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि लिंबूचे ब्लीचिंग गुणधर्म टॅनिंग कमी करतात. तसेच चंदन आणि हळद त्वचेला उजळवण्यासाठी प्रभावी ठरतात.

टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे…

१. दही आणि हळद मिसळून त्वचेवर लावले तरी टॅनिंग कमी होते.
२. बटाट्याचा रस त्वचेवर लावल्याने त्याच्या ब्लीचिंग गुणधर्मांमुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला बटाट्याचा रस त्वचेवर १५ ते २० मिनिटे लावावा लागेल.
३. टॉमेटोचा रस टॅनिंग कमी करण्यात उपयोगी ठरतो.
४. काकडीचा रस हायड्रेटिंग आणि थंड गुणधर्मांनी समृद्ध आहे. टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही त्याला त्वचेवर लावा.
५. ओटमीलला (oatmeal) ताकात भिजवा आणि नंतर तयार केलेली पेस्ट टॅनिंग काढून टाकण्यासाठी स्क्रब म्हणून वापरा. ​​त्वचेवर जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशी निघून जाण्यास मदत होईल.