पिग्मेंटेशन ही त्वचेवरील एक सामान्य समस्या असून याचा उपचार संभव आहे. पिग्मेंटेशनची समस्या केवळ चेहऱ्यावरच नाही तर शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. पिग्मेंटेशनमुळे अनेक लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. अंडरआर्म्समध्ये ही समस्या उद्भवल्यास महिलांना हवा तो ड्रेस घालण्यास संकोच वाटतो. उन्हाळ्यात हाफ स्लीव्ह ड्रेस उष्णतेपासून आराम तर देतोच शिवाय छान लुकही देतो, परंतु अशा परिस्थितीत हाफ स्लीव्ह ड्रेस घालणं कठीण होऊन बसते. ज्या लोकांच्या त्वचेचा रंग गडद आहे त्यांच्या त्वचेवर मेलॅनिन किंवा मेलेनोसाइट्सची संख्या वाढल्यामुळे अंडरआर्म्स गडद होण्याची अधिक शक्यता असते. जाणून घेऊया अंडरआर्म्स गडद होण्याची इतर कारणे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही डिओडोरंट्स त्वचेला त्रास देऊ शकतात आणि त्वचा काळीही करू शकतात. विशेष म्हणजे, केस काढण्याचे तंत्र जसे की शेव्हिंग, प्लकिंग आणि वॅक्सिंगमुळे आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते ज्यामुळे विशिष्ट भागात जास्त मेलेनिन उत्पादन होते.

पाणीपुरी खाऊन कमी करता येणार वजन? समोर आली आश्चर्यकारक माहिती

एक्सफोलिएशनच्या कमतरतेमुळे पिगमेंटेशनची समस्या देखील वाढू शकते. तसेच शरीरातील हार्मोनल बदल पिगमेंटेशन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. इन्सुलिन रेझिस्टन्स, ड्रग साइड इफेक्ट्स आणि शेव्हिंगनंतर त्वचेत उरलेले रंगद्रव्य यामुळेही ही समस्या निर्माण होते. त्वचा तज्ज्ञांच्या मते, अंडरआर्म पिग्मेंटेशन टाळण्यासाठी काही खास उपाय करून तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.

डिओडोरंट बदला : जर तुम्हाला पिगमेंटेशनचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम तुमच्या डिओडोरंटचा ब्रँड बदला. सुगंध नसलेले डिओडोरंट वापरा.

शेविंग : शेव्हिंग करताना रेझर तुमच्या केसांना त्रास देऊ शकतो, त्यामुळे शेव्हिंग करताना जास्त दबाव टाकू नका.

सनस्क्रीनचा वापर : सनस्क्रीन ही सर्व ऋतूंमध्ये त्वचेची गरज असते. सनस्क्रीन त्वचेला उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. यामुळे याचा नियमित वापर करा.

सतत लघवी होणे ठरू शकते ‘या’ आजाराचे कारण; लगेचच आहारात करा बदल

सैल कपडे घाला : घट्ट कपड्यांमुळे हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते, म्हणून शक्यतो सैल कपडे घाला.

फिटनेसवर लक्ष केंद्रित करा : सक्रिय जीवन जगा. तुमच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करून आणि वजन कमी करून अंडरआर्म पिग्मेंटेशनपासून मुक्ती मिळू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problems with underarm pigmentation feel free to use these tips pvp