उन्हाळ्यानंतर मान्सुची चाहूल लागते. पावसाळ्याच्या सुरुवातीला वातारवण प्रसन्न वाटत असलं तरी याच काळावधीमध्ये ऋतूबदलामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. डॉ. आशिष धडस यांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यात अनेकांना पोटाच्या व्याधींची समस्या जाणवते. अपचन, पोटात गॅसेस होणे, बद्धकोष्ट या त्रासामुळे उलट्या जुलाब पोटदुखी हे आजार देखील उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांना अॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांना पावसाळ्यात अधिक त्रास होतो. त्यांनी अधिक काळजी घेतली तर हा त्रास टाळता येईल. पावसाळ्यात अपचनाचा त्रास होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपली पचनसंस्थेची कार्यशीलता कमी होते. हवेतील आद्र्तेमुळे असं होतं. पोट, स्वादूपिंड, आतड्यांचं कार्य मंदावतं आणि पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. आता आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर या ऋतूमध्ये आपल्या शरीरात वात वाढतो व पित्त जमा होते. या व्यतिरिक्त पाणी व खाद्य पदार्थांमधून जिवाणू व विषाणूंचा संसर्ग होण्याचा संभव असतो. पोटाचे हे त्रास टाळण्यासाठी आपण जाणून घेतलं पाहिजे की या दिवसात पचनशक्ती का कमी होते असते. जाणून घेऊयात पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी.
> पचायला जड असणारे तेलकट पदार्थ टाळावे ,निदान रात्रीच्या वेळेस हे पदार्थ खाऊ नये .
> या ऋतूमध्ये मासे, रस्त्याकडील स्टॉलवरील पदार्थ शक्यतो खाऊ नये.
> फळे, भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा.
> रोजच्या आपल्या चहा ऐवजी हर्बल टी घ्यावा. तसेच सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्याआधी कोमट पाणी प्यावे.
> जेवणानंतर एक चमचा गाईचे तूप घ्यावे. त्यावर कोमट पाणी घेतल्यास उत्तम कारण हे आतड्यांसाठी फायद्याचं असतं
> पावसाळ्यात बाहेर चालायला जाणं आणि व्यायाम हे कमी होतात. रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे किमान ३० मिनिटं शारीरिक व्यायाम करावे. सूर्यनमस्काऱ योगासने हे घरच्या घरी देखील शक्य असल्याने ते करावे.
> पोटाचे त्रास झाल्यावर ओवा, गरम पाणी इत्यादी घरच्या घरी उपाय केले जातात. यात काही गैर नाही. पण त्रास जास्त प्रमाणात व जास्त काळ असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ. आशिष धडस यांच्या सांगण्यानुसार अॅसिडिटी म्हणून जो त्रास अंगावर काढला जातो तो पोटातील अल्सर, पिताषयातील खडे व अपेंडिक्सला सूज येण्याचे संकेत असू शकता. या विकारांमुळे सुद्धा पोटाचे आजार होऊ शकतात.
सध्या करोनाच्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे, ती म्हणजे कोविडच्या काही रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप ही सामन्य लक्षणं न दिसता उलट्या, जुलाब, पोटदुखी असे त्रास होतात. हे होण्यामागचे कारण म्हणजे करोना व्हायरस मानवी शरीरातील ‘एस टू रेसिपिटर्स’ला जोडले जातात. हे वयोमानानुसार काहींच्या पोटात, आतड्यात, स्वादूपिंडात देखील आढळून येतात. यामुळे बाहेरचं अन्न, शिळं अन्न न खाता असा त्रास होऊ लागला तर घरगुती उपचार न करता डोक्टरांचा सल्ला घ्या. करोनातून बरे झाल्यानंतर तीन ते चार आठवडयानंतर असाह्य पोटदुखी उलट्या हा त्रास आतडांच्या विकरामुळे होऊ शकतो. मान्सूनच्या या ऋतूमध्ये योग्य आहार व सध्याच्या काळात जागृता बाळगा.
(डॉ. आशिष धडस :- समता हॉस्पिटल व सुरेखा व्हेरीकोज व्हेन्स क्लिनिक , डोंबिवली)
आणखी वाचा