National Cancer Awareness Day 2023 : कर्करोग हा शब्द जरी कानावर पडला तरी अंगावर काटा येतो. दरवर्षी हजारो लोकं कर्करोगाचे शिकार होतात. कारण कर्करोगावर प्रभावीपणे काम करणाऱ्या औषधी सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे दरवर्षी कित्येक लोकांचा उपचाराअभावी बळी जातो. पुरुषांमध्ये आढळला जाणारा प्रोस्टेट कर्करोगाविषयी तुम्हाला माहिती आहे का? या कर्करोगाची लक्षणे काय आहेत? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेऊया.

प्रोस्टेट कर्करोग

पुरुषांच्या प्रोस्टेटमध्ये होणारा हा आजार आहे. जेव्हा पुरुषांच्या पौरुष ग्रंथीमधील पेशी अनियंत्रितपणे वाढतात, तेव्हा हा कर्करोग निदर्शनास येतो. या ग्रंथी मूत्राशयाच्या अगदी खाली आणि गुदाशय समोर स्थित असते.याचा आकार अक्रोडप्रमाणे असतो आणि या ग्रंथी भोवती मुत्राशयातून लघवी बाहेर काढणारी नळी असते. या ग्रंथीचे मुख्य कार्य पुरुष बीजाण्डामध्ये तयार होणाऱ्या शुक्राणूंना ओलावा देणे आणि पोषण करणे होय.याशिवाय लघवीचे प्रवर्तन नियंत्रित करणे हेही या ग्रंथीचे दुय्यम कार्य आहे.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
Mercury Rise in Scorpio
‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार, बुध ग्रहाच्या कृपेने मिळणार अपार संपत्ती
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा आयुष्यात होतील मोठे बदल! सोमवारी तुमचे नशीब चमकणार का?
Kanya Rashifal 2025
नववर्षात कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसाय आणि करियरवर होईल वाईट परिणाम? जाणून घ्या कसे जाईल २०२५?
8 December Aries To Pisces Horoscope Today
८ डिसेंबर पंचांग: कोणाला होईल अचानक धनलाभ ते कोणाचा वाढेल ताण; जन्मराशीनुसार आजचा रविवार १२ राशींसाठी कसा असणार?

हेही वाचा : Smoking and Hair Fall : धूम्रपानामुळे केस गळतात का? कसा होतो केसांवर परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे

१. लघवी करताना वेदना होणे किंवा जळजळ जाणवणे.
२. वारंवार लघवी करणे. जर तुम्हाला रात्रभर वारंवार लघवीला जायची इच्छा होत असेल तर सतर्क राहणे आवश्यक आहे.
३. लघवीच्या वेळी तणाव जाणवणे.
४. लघवी येण्यासाठी आणि थांबवण्यासाठी ताण येणे.
५. लघवी करताना रक्त येणे.
६. थकवा जाणवणे.
७. कारण नसताना अचानक वजन कमी होणे.
८. पाठदुखी आणि हातांच्या-पायांच्या हाडांमध्ये सतत वेदना जाणवणे.

सुरुवातीच्या काळात प्रोस्टेट कर्करोगाचे कोणतेही लक्षण दिसून येत नाही. जेव्हा लघवी करण्यास अडचण निर्माण होते, तेव्हा याची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे प्रोस्टेट कर्करोगाच्या कोणत्याही लहान मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

Story img Loader