How to Protect Your Hairs From Holi Colours: होली है… होली है… असं दणाणून सांगणारा होळीचा उत्साह आता सगळीकडे दिसायला सुरुवात झालेली आहे..या सणात आपण उत्साहात रंग खेळताे. पण रंग खेळण्यापुर्वी जर आपण योग्य ती काळजी घेतली नाही, तर मात्र मग त्याचा वाईट परिणाम नंतर केसांवर आणि त्वचेवर दिसून येतो. होळीच्या उत्सवादरम्यान वापरलेले रंग त्यांच्या रासायनिक रचनेमुळे तुमच्या केसांना नुकसान पोहोचवू शकतात. पण घाबरू नका! आधी आणि नंतर योग्य काळजी घेत तुम्ही तुमच्या केसांची नैसर्गिक चमक आणि चैतन्य पुन्हा जिवंत करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होळी खेळण्यापूर्वी केसांना मास्क लावा

होळीच्या एक-दोन दिवस आधी, केसांवर हेअर मास्क लावा. यामुळे केसांच्या रंगावर त्याचा परिणाम होणार नाही. मास्कमुळे केस आतून मजबूत राहतील, व रंगाचा थेट परिणाम केसांवर होणार नाही.

केसांना भरपूर तेल लावा

होळीच्या आधी केसांची काळजी घेण्याची सुरुवात केसांना भरपूर तेल लावण्यापासून झाली पाहिजे. नैसर्गिक तेलाचा वापर करा कारण ते हलके, मऊशार असते आणि केसांवर एक संरक्षक आवरण बनून पसरून राहते. केसांच्या खालील त्वचेवर तसेच केसांवर सर्वत्र भरपूर तेलाने मसाज करा आणि तेल सर्वत्र नीट पसरले आहे याची खात्री करून घ्या.

केस मोकळे सोडू नका

रंग खेळायला जाताना केस मोकळे सोडू नका, बन किंवा वेणी घाला, त्यामुळे रंग कमीत कमी केसांपर्यंत पोचतात. केस सुरक्षितपणे बांधलेले असतील तर त्यामध्ये रंग अडकून राहत नाहीत, केस तुटण्याचा, त्यांचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो, हे कायम लक्षात ठेवा जेणेकरून केस सुरक्षित राहतील.

केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा

रंग खेळून झाल्यानंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. पाणी खूप गरम असेल तर केसांमधील नैसर्गिक तेले निघून जातात व केस कोरडे, निस्तेज होतात. त्यामुळे केसांमधील रंग काढण्यासाठी आणि ते स्वच्छ करण्यासाठी सौम्य, सल्फेट-फ्री शाम्पू वापरा. केसांवर शाम्पू अतिशय हळुवारपणे लावा, जिथे रंग जास्त जमा झाला आहे तिथे जास्त लक्ष द्या.

नरिशिंग मास्क लावा

शँपू करून झाल्यानंतर केस पुन्हा सतेज व चमकदार व्हावेत यासाठी नरिशिंग मास्क लावा. कलर-ट्रीटेड केस स्वच्छ करण्यासाठी, विस्कटलेले केस नीट करण्यासाठी आणि केसांची चमक वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला रिच फॉर्म्युला वापरा. तसंच होळीनंतर लगेचच हीट स्टायलिंग करू नका, अशाप्रकारे तुम्ही केसांचे अजून जास्त नुकसान होण्यापासून टाळू शकाल. एअर ड्राइंग करा किंवा ब्लो ड्रायरवरील कूल सेटिंगचा वापर करा.

होळी खेळताना केसांचे नुकसान होऊन आनंदावर पाणी पडू नये यासाठी विशेष काळजी घेतलीच पाहिजे. वर दिलेल्या टिप्सचे पालन करून तुम्ही तुमचे केस निरोगी व सुंदर राखू शकाल. चला तर मग, होळीसाठी रंगांबरोबरीनेच केसांनादेखील नीट काळजी घेऊन तयार करू या.