स्तनाच्या कर्करोगाचा प्रसार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन प्रथिनांचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना य़श आले आहे. या शोधामुळे या असाध्य रोगावर उपचार करण्यासाठी नव्या औषधांच्या संशोधनामध्ये मोलाची भर पडणार आहे. राईस विद्यापीठ, उत्तर टेक्सास विद्यापीठ, डेंटोन (य़ूएनटी), कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो(यूसीएसडी) आणि जेरूसलेमस्थित हिब्रू विद्यापीठामधील संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय चमूने या संशोधनावर काम सुरू केले आहे. या संशोधनामुळे कर्करोगाच्या झपाट्याने वाढणाऱया गाठी नियंत्रणामध्ये आणता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते कर्करोगाच्या पेशींमध्ये वाढ करणारी व ‘नीट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रथिनांच्या जोडीतील ‘एनएफ-१’ आणि ‘मिटोनीट’ ही प्रथिने नियंत्रणामध्ये आणल्यास कर्करोगाच्या गाठींचा आकार कमी करण्यात मदत होणार आहे. ‘मिटोनीट’ या प्रथिनावर राईस विद्यापीठाच्या सैद्धांतिक जैव भौतिकी केंद्रामध्ये(सीटीबीपी) संशोधन सुरू आहे. ‘एनएएफ-१’ व ‘मिटोनीट’ या दोन्ही प्रथिनांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये साम्य आहे.
“स्त्रियांमधील स्तनाच्या कर्करोगावरील उपचारामध्ये या संशोधनाचा फायदा होणार असून, या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यामध्ये यश मिळणार आहे”, असे राईसच्या ‘सीटीबीपी’चे सहसंचालक जैव भौतिकी शास्त्रज्ञ जोस ओनूचीक यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा