PlayerUnknown’s Battleground म्हणजेच PUBG हा खेळ सध्या सर्वच वयोगटामध्ये प्रसिद्ध होताना दिसत आहे. या ऑनलाईन गेमने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या खेळाचा सिझन ४ लाँच होत असून याबाबत कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे माहिती दिली आहे. या गेमचा तिसरा सिझन Battle Royale Game १८ नोव्हेंबर रोजी संपला. त्यानंतर लगेचच चौथा सिझन लाँच होत असल्याने हा गेम खेळणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. येत्या २ दिवसांत हे नवे व्हर्जन कनेक्ट करता येणार आहे.
सिझन ३ चा स्कोअर आणि रँकींग आपल्या अकाऊंटसोबत जोडले जाणार नाही. त्यामुळे या व्हर्जनमध्ये पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. या नव्या सिझनमध्ये नकाशाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या नव्या सिझनचे नाव Royal Pass असेल. यामध्ये युजर्सना प्रत्येक आठवड्यात नवीन चॅलेंज देण्यात येणार आहे. या नव्या सिझनमध्ये ग्राहकांना एलिट अपग्रेड आणि एलिट अपग्रेड प्लस असे २ पर्याय देण्यात येणार आहेत. या दोन्हीमध्ये गेम खेळणाऱ्यांना वेगवेगळे फायदे मिळणार आहेत. या नवीन बदलांबरोबरच युजर्स नव्या सिझनमध्ये असॉल्ट रायफल M762 चा वापर, नवीन हत्यारे, पॅराशूटचा वापर, विमान आणि वाहने मिळवू शकणार आहेत. या नव्या सिझनमध्ये आणखी एक खास बाब आहे, ती म्हणजे या गेमच्या कॉम्प्युटर व्हर्जनला मोबाईल व्हर्जनमध्ये बदलता येणार आहे.
Another season has come and gone. Hopefully you got what you needed in Season 3. But worry not, because Season 4 is just around the corner! Stay tuned.
— PUBG MOBILE (@PUBGMOBILE) November 18, 2018
आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अॅक्शनमुळे तरुणाईला या गेमची कमी काळात भुरळ पडली आहे. वाळवंट, शहर आणि जंगल अशा तीन थीममध्ये एकटय़ाने किंवा दोघांची अथवा चौघांची टीम बनवून हा गेम खेळला जातो. एका बॅटलफिल्टमध्ये १०० अनोळखी गेमर्स एका वेळेस हा गेम खेळतात. गेम खेळण्यासाठी दिलेली जागा हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे एकमेकांना ठार करून शेवटी जिवंत राहणारा या गेममध्ये जिंकतो. या गेममध्ये हॉकी स्टिक्स, एके ४७, मशीनगन्स, तलवारीच्या साहाय्याने समोरच्या गेमरला ठार मारले जाते. फेसबुक लॉगइनच्या मदतीने गेम खेळल्यास आपल्या फेसबुक मित्रांबरोबर टीम करून हा गेम खेळता येतो.