Post Lunch Nap Benefits: आजवर आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्समधून पुणेकरांना दुपारच्या झोपेवरून ट्रोल होताना पाहिले असेल पण मंडळी तुम्हाला खरोखरच या दुपारच्या झोपेचे फायदे वाचून आज थक्कच व्हायला होईल. सेलिब्रिटी पोषणतज्ञ रुजुता दिवेकर, यांनी दुपारच्या जेवणानंतर डुलकी घेण्याचे विविध फायदे सांगितले आहेत. इतकंच नाही तर दुपारी झोपण्याची योग्य वेळ व पद्धत सुद्धा त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट सांगितली आहे. तर दुपारची झोप म्हणजेच वामकुक्षी ही नेमकी कधी, किती वेळ व कशी घ्यावी यावर तज्ज्ञांची माहिती जाणून घेऊयात…
तर, दुपारची झोप घेण्याचे काय फायदे आहेत?
रुजुताच्या मते, दुपारी झोपल्याने पुढील गोष्टी होतात:
• सुधारित हृदय आरोग्य: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी किंवा ज्यांनी आधीच त्यांच्या हृदयावर प्रक्रिया केली आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः चांगले आहे
• सुधारित हार्मोन्स संतुलन मधुमेह: पीसीओडी, थायरॉईड याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त
• सुधारित पचन: कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता, पुरळ आणि कोंडा घालवण्यासाठी उपयोगी
• रात्रीची झोप सुधारणे, निद्रानाश कमी होण्यास मदत
• रोग प्रतिकारक शक्तीत वाढ व आजारांपासून आराम
• फॅट लॉससाठी मदत (अर्थात वरील घटक सुधारल्यास वजन कमी होण्यास मदत होईल हे साहजिकच आहे)
रुजुता दिवेकर सांगतात की, दुपारच्या झोपेचे अनेक फायदे असले तरी, आधुनिक जीवनशैलीत अनेकदा योग्य पद्धतीने झोप न घेतल्यास सुस्ती, निद्रानाश आणि लठ्ठपणाला कारण ठरू शकते. डॉ. रितेश शाह, भाटिया हॉस्पिटल यांच्या माहितीनुसार, “अलीकडे प्रकाशित झालेले अभ्यास सूचित करतात की पॉवर नॅप मेंदूचे काम सोपे करण्यासही मदत करतात. जसे की,
- स्मरणशक्ती वाढवणे
- एकाग्रता वाढवणे
- मनःस्थिती उत्तम करणे
- तणाव कमी करणे
- तुम्हाला अधिक सतर्क राहायला मदत होते
पण हे फायदे मिळविण्यासाठी काय करावे? दिवेकर स्टेप्स शेअर करतात:
- कधी: दुपारच्या जेवणानंतर लगेच.
- कसे: तुमच्या डाव्या बाजूला वळून झोपा.
- किती वेळ : १० – ३० मिनिटे (अगदी लहान, खूप वृद्ध आणि खूप आजारी लोकांसाठी सुमारे ९० मिनिटे)
- झोपण्याची योग्य वेळ: दुपारी १ ते ३.
झोपण्याचे नियम:
- संध्याकाळी ४ ते ७ या दरम्यान झोपणे टाळावे अन्यथा रात्रीच्या झोपेत अडथळा येऊ शकतो
- दुपारच्या जेवणानंतर चहा, कॉफी, सिगारेट आणि चॉकलेट यांसारखे उत्तेजक सेवन टाळा .
- टीव्ही चालू ठेवून झोपू नका.
- ३० मिनिटांहून अधिक वेळ झोपणे टाळा
हे ही वाचा<< ३० दिवसात गालाचे फॅट्स व डबल चीन कमी करण्यासाठी ‘हे’ तीन व्यायाम आहेत बेस्ट! जागेवरून उठायची गरज नाही
दिवेकर सांगतात की, “घरी असल्यास, बेडवर झोपा. कामावर असल्यास, डेस्कवर आपले डोके खाली ठेवा आणि विश्रांती घ्या (तुमच्या एचआरला सांगा की यामुळे उत्पादकता वाढते). याशिवाय, तुम्ही खुर्चीवर झोपू शकता.