दैनंदिन खाद्यंतीमध्ये फास्टफूड, जंकफूड यांचे वाढते प्रस्थ आणि जागतिकरणाने झालेल्या सपाट जगामध्ये पारंपरिक पौष्टिक अन्नपदार्थाऐवजी शरीरशत्रू खाद्याकर्षणे निर्माण झाली. फास्टफूड, जंक फूड आणि नव्या ग्लोकल आहार पद्धतीने स्थूलत्त्वापासून आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत.
जीवनशैलीवरही या नव्या खाद्यंतीचा परिणाम होत आहे. हे सर्व टाळायचे असेल तर सात्विक, आरोग्याचे तंत्र सांभाळणाऱ्या आहाराचा समावेश आपल्या रोजच्या आहारात व्हायला हवा. त्यासाठीच ‘लोकसत्ता’ घेऊन आले आहे, तब्बल १२० पाककृतींची माहिती देणारे ‘पूर्णब्रह्म.’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी,
२३ एप्रिल रोजी होणार आहे. वैद्य खडीवाले यांनी सिद्ध केलेल्या
१२० पाककृतींचा या पुस्तकात समावेश आहे.
आहार आणि आरोग्य यांचा समतोल साधत रुचिपालट व रुचिवैविध्याला चालना देतानाच आरोग्याचे तंत्र सांभाळण्याची पूरेपूर खबरदारी यात घेण्यात आली आहे. त्यामुळेच या पुस्तकाइतकाच त्याचा प्रकाशन सोहळाही वाचकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी वैद्य खडीवाले वाचकांच्या आहारविषयक शंकांचे निरसन करणार आहेत. गोल्ड विनर प्रस्तुत, ‘पितांबरी’द्वारा सहप्रायोजित आणि ड्रीम व्हेकेशन्सने पुरस्कृत केलेले ‘पूर्णब्रह्म’ हे मासिकाच्या आकारातील ‘लोकसत्ता’चे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीच्या पंगतीला पूर्णत्व देणारे मानाचे पान ठरणार, हे नक्की.
*प्रकाशन : २३ एप्रिल २०१४
*कुठे : स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, दादर
*किती वाजता : दुपारी ४
*प्रवेश : कार्यक्रम सर्वासाठी खुला; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
बुधवारपासून सर्वत्र उपलब्ध
‘पूर्णब्रह्म’: आरोग्यदायी आहारमित्र!
दैनंदिन खाद्यंतीमध्ये फास्टफूड, जंकफूड यांचे वाढते प्रस्थ आणि जागतिकरणाने झालेल्या सपाट जगामध्ये पारंपरिक पौष्टिक अन्नपदार्थाऐवजी शरीरशत्रू खाद्याकर्षणे निर्माण झाली.
First published on: 21-04-2014 at 03:23 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purnabramha healty dit friend