Kitchen Jugaad स्वयंपाक करताना कुकरचा वापर सर्वजण करतात. कुकरमध्ये अन्न शिजवल्यास वेळीची बचत होतेच त्याचबरोबर गॅस देखील वाचतो. कुकरच्या मदतीने कोणताही पदार्थ झटपट शिजवण्यासाठी मदत होते. डाळ, भाज, भाज्या, बटाटे यांसह विविध पदार्थ कुकर वापरून झटपट तयार केले जातात. घाईच्या वेळी कुकरमध्येच फोडणी देऊन डाळ किंवा मसाले भात तयार केला जातो. पण कुकर वापरताना काही समस्यांचा सामनाही करावा लागतो. अनेकदा कुकरमध्ये पाणी जास्त झाले तर शिट्टीमधून किंवा झाकणातून पाणी बाहेर येते. त्यामुळे कुकर खराब होतोच पण त्याचबरोबर शेगडी आणि ओटाही खराब होतो. त्यामुळे विनाकारण साफ सफाई करण्यात वेळ जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्हाला ही समस्या जाणवण असेल तर चिंता करू नका, प्रत्येक छोट्या मोठ्या समस्येसाठी आपल्याकडे काही नाही काही जुगाड असतो. कुकरच्या शिट्टीतून किंवा झाकणातून पाणी येणे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी यूट्यूबवर एक उपाय सांगितला आहे. ट्रिक वापरली तर कुकरच्या शिट्टी किंवा झाकणातून पाणी येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. स्वयंपाक घरातील एक गोष्ट वापरून या समस्येतून तुमची सुटका होईल.

हेही वाचा – फक्त दोन शिट्टी द्या अन् कुकरमध्ये कढवा तूप; पाहा तूप बनवण्याची नवी पद्धत, Viral Video

कुकरच्या शिट्टीमध्ये हा पदार्थ टाकून पाहा होईल कमाल
स्वयंपाक घरामध्ये तेल हे हमखास असते. कोणतेही तेल घ्या आणि कुकरच्या शिट्टीमध्ये ४ थेंब तेल टाका. त्यानंतर कुकरच्या झाकणाला असलेली काळी रिंग काढून तिथेही तेल टाका. त्यानंतर पुन्हा रिंग लावा. त्यानंतर तुम्ही डाळ, भात किंवा कोणताही पदार्थ त्या कुकरमध्ये तयार करू शकता. तेल टाकल्यानंतर कुकरच्या शिट्टीतून किंवा झाकणातून पाणी येणार नाही.

हेही वाचा – पाणी वापरून बनवा तूप! विश्वास बसत नाहीये मग ‘ही’ सोपी ट्रिक एकदा वापरून बघा; पाहा Viral Video

इंस्टाग्रामवर Karnal Plus नावाच्या पेजवर ही ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक कशी करायची ते व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. ही ट्रिक उपयूक्त आहे की नाही हे तुम्ही स्वत: वापरून पाहा.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)