लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना अनेक वेळा अन्न चिकटते. विशेषत: तुम्ही डोसा, बेसनपोळी किंवा फ्राइड यांसारखे पदार्थ बनवल्यास ते अनेकदा तव्याला किंवा कढई चिकटून खराब होतात ज्यामुळे तुमचा पदार्थ खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत बहुतांश लोकांना नॉन-स्टिक भांडी खरेदी करावी लागत आहेत. मात्र, बाजारात या भांड्यांची किंमत खूप जास्त असून, नॉन स्टिक भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित मानले जात नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला काही आश्चर्यकारक टिप्स सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमची सामान्य भांडी नॉन-स्टिक बनवू शकता.
या टिप्सचा अवलंब केल्याने तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही, तसेच तुमचे अन्न खराब होऊ शकतो आणि न चिकटवता सहज शिजले जाईल, तर चला जाणून घेऊया…
तेल वापरा
शेफ कुणाल कपूरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ही खास ट्रिक शेअर केली आहे. एका व्हिडिओमध्ये शेफ समजावून सांगतो की, लोखंडी कढईत शिजवताना अन्न चिकटले किंवा जळले तर प्रथम गॅसवर पॅन गरम करा. खूप गरम झाल्यावर त्यात २ ते ३ चमचे तेल टाका आणि स्वच्छ सुती कापडाच्या मदतीने हे तेल गरम तव्यावर पसरवा. असे केल्याने, तुमचा सामान्य पॅन देखील नॉन-स्टिक पॅन प्रमाणे काम करण्यास सुरवात करेल, म्हणजेच अन्न त्यावर चिकटणार नाही.
हेही वाचा – झोपेतून उठताच तुमचा चेहरा सुजलेला दिसतो का? ‘ही’ ६ कारणं वाचून ठेवा, सूज कमी करायची तर आधी हे उपाय कराच
त्याच वेळी, शेफ सांगतात की, तुम्ही ही युक्ती स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यांवर देखील वापरू शकता.
कांद्याची मदत घ्या
जर तुम्हाला स्टीलची भांडी नॉन-स्टिक बनवायची असतील, तर तुम्ही यासाठी आणखी एक युक्ती वापरून पाहू शकता. यासाठी प्रथम भांडे गॅसवर ठेवा आणि चांगले गरम करा. आता एक कांदा मधोमध कापून घ्या आणि कापलेला भाग गरम स्टीलच्या भांड्यावर नीट घासून घ्या. असे केल्यावरही अन्न भांड्याला चिकटत नाही. तुम्ही ही पद्धत लोखंडी तव्यासाठी देखील वापरून पाहू शकता.
मीठ
या सर्वांव्यतिरिक्त, तुम्ही ॲल्युमिनियमची भांडी नॉन-स्टिक बनवण्यासाठी आणखी एक युक्ती वापरून पाहू शकता. यासाठी प्रथम भांडे चांगले गरम करावे. आता त्यात थोडे मीठ टाका आणि मीठाचा रंग हलका लाल दिसू लागेपर्यंत भांड्यावर घासून घ्या. यानंतर भांड्यातून मीठ काढून घ्या. या युक्तीने अन्न भांड्यांना चिकटण्यापासून देखील रोखता येते.