आजकाल वजन कमी करण्यासाठी ‘मसाला चहा’ ऐवजी ‘ग्रीन टी’ घेण्याला प्राधान्य दिलं जातं. ग्रीन टी हे एक ‘आरोग्यदायी पेय’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. इतर चहापेक्षा ग्रीन-टी मध्ये अॅंटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात. ग्रीन टी मधील फायटोकेमिकल्स, पॉलिफेनॉल, इन्झायमी आणि अमिनो अॅसिड तुमच्या मनाला निवांत करतात. ग्रीन टीमुळे तुमची त्वचा नितळ होते, चयापचयाचे कार्य सुधारते. ग्रीन टीमुळे केवळ तुमचं मनच शांत होतं असे नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराच्या स्वास्थासाठी ग्रीन टी फायदेशीरच ठरते. त्याचे फायदे वाढवण्यासाठी आणखी दोन गोष्टी त्यात टाकता येतील. जाणून घेऊया कोणत्या आहेत, त्या दोन गोष्टी.
- ग्रीन टी ला समजा आरोग्यदायी पेय
चहा प्रेमींनी ग्रीन टी कडे चहाचा पर्याय म्हणून न पाहता आरोग्यदायी पेय म्हणून बघावे. जर तुम्ही ग्रीन टी फक्त पाण्यात उकळून प्यायले तर तुम्ही त्यात आले आणि दालचिनी या दोन गोष्टी टाकू शकता ज्यामुळे त्याचे फायदे वाढतील.
हे ही वाचा : Kidney Damage Symptoms: सावधान, किडनी फेल होण्याआधी शरीर देतं ‘हे’ ८ भयंकर संकेत, वेळीच ओळखा नाहीतर…!
- ग्रीन टी बनवण्याची योग्य पद्ध्त
एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात दालचिनी पावडर किंवा दालचिनीचा छोटा तुकडा घाला. या पाण्यात दोन्ही गोष्टींचा अर्क येईपर्यंत उकळवा. आता एका कपमध्ये ग्रीन टीची पाने टाका आणि हे पाणी वरून टाका. पाण्याचा रंग बदलेपर्यंत ५ मिनिटे असेच राहू द्या. आता हा चहा गाळून प्या. त्यात गोडवा आणायचा असेल तर तुम्ही त्यात मधही घालू शकता.
- आले आणि दालचिनी घालण्याचे फायदे
दालचिनी आणि आले या दोन्हीमध्ये अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म आहेत आणि ते अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. दालचिनीमुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. याचा मधुमेहविरोधी प्रभाव देखील आहे. इतकेच नाही तर अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये हे फायदेशीर मानले जाते. तसेच काही अभ्यासांतून त्याचे कर्करोगविरोधी गुणधर्म दिसून आले आहेत. हे परिणाम चाचणी ट्यूब आणि प्राण्यांच्या अभ्यासावर आधारित आहेत.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)