मच्छर, पाल आणि उंदरामुळे तुम्ही हैरान झाला आहात का मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. घरात माश्या, मच्छर, पाल किंवा उंदीर यांचा शिरकाव सहज होतो पण त्यांना बाहेर काढता काढता आपल्या नाकी नऊ येतात. तसेच अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तुमच्या घरात लहान मुलं असेल ज्यांना मच्छर चावण्याची भीती वाटतं असेल किंवा तुम्हाला पाल किंवा उंदरांची भीती वाटत असेल तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. माश्या, मच्छर, पाल किंवा उंदारपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करून पाहिले असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा. त्यासाठी तुम्हाला फार खर्चही करावा लागणार नाही. माश्या, मच्छर, पाल किंवा उंदरापासून सुटका मिळवण्यासाठी कांदा तुम्हाला मदत करणार आहे? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की, कांद्यांमुळे मच्छर. पाल आणि उंदीर कसे पळून जातील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ या
सोशल मीडियावर एका पेक्षा एक भन्नाट ट्रीक व्हायरल होत असतात ज्यामुळे आपल्या रोजच्या दैनदिन जीवनातील छोट्या मोठ्या समस्या सहज दूर करता येतात. काही सोपे जुगाड वापरून तुम्ही तुमच्या समस्या सोडवू शकता. सध्या असाच एक हटके जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मच्छर, पाल आणि उंदरांपासून सुटका मिळवण्याचा एक जुगाड दाखवला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कांदा घेऊन त्यामध्ये चाकूने एक खड्डा करा. त्यात कडुलिंबाचे तेल अथवा मोहरीचे तेल टाका आणि त्यात कापसाची वात लावून ती पेटवा. ज्या ठिकाणी माश्या, मच्छर, पाल किंवा उंदीर जेथून घरात शिरतात तिथे ठेवा. वातीच्या धुर अत्यंत तीव्र असतो ज्यामुळे मच्छर, माश्या, पाल किंवा उंदीर घरात शिरू शकत नाही असा दावा या व्हिडीओत केला आहे.
ही ट्रिक इंस्टाग्रामवर _unique__food_insta वर अकांउटवर पोस्ट केली आहे. व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ही ट्रिक उपयुक्त आहे की नाही हे तुम्हील स्वत: वापरून पाहा.
(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)