iphone असे म्हटले तरी आजही अनेकांच्या भुवया उंचावतात. स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरला जाणारा अॅपल कंपनीचा फोन ही सध्या ग्राहकांमध्ये क्रेझ झाली आहे. महाग असला तरीही iPhone च्या तंत्रज्ञानाला अजून कोणती कंपनी टक्कर देऊ शकलेली नाही. मात्र आता एका देशातील लोकांना iPhone वापरण्याचा आनंद घेता येणार नाही. आता हा देश कोणता आणि असे काय घडले की याठिकाणी आयफोनवर बंदी येणार आहे. तर जर्मनीमध्ये iPhone वर बंदी येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे iPhone आणि Qualcomm या दोन कंपन्यांमध्ये सुरु असलेला पेटंटचा वाद न्यायालयात गेला आहे. या वादाच्या निकालानंतर iPhone वर बंदी लागण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे बंदी लागू झाल्यास अॅपल कंपनी या निर्णयाविरोधात याचिका दाखल करु शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशाप्रकारे जर्मनीमध्ये अॅपलवर बंदी लागल्यास iphone 7plus, 7, 8, 8plus आणि iphone X या फोनवर बंदी येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, Qualcomm ने ठराविक रक्कम अनामत म्हणून (सिक्युरीटी डिपॉझिट) जमा केल्यास अॅपलच्या उत्पादनांवर लगेचच बंदी घालण्यात येणार आहे. ही रक्कम अॅपलला झालेला तोटा भरुन काढण्यासाठी उपयुक्त ठरेल असे न्यायालयाने सांगितले आहे. याआधी चीनमध्येही Qualcomm अॅपलच्या विरोधात एक खटला जिंकले होते. Qualcomm चिप्सचा वापर अॅपलच्या iPhone मध्ये होत असल्याने दोन्ही कंपन्यांच्या पेटंटबाबत वाद सुरु होता. अॅपलने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीमध्ये सर्व स्टेअर्समध्ये असलेले iPhone कंपनी परत घेत आहे. चीनमध्येही अॅपलने न्यायालयाला आपल्या खटल्यावर पुर्नविचार करावा असे सुचवले आहे.