R Madhavan Weight Loss Journey: मॅडी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आर माधवनने चमत्कार वाटावा इतक्या वेगाने आपलं वजन कमी करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अलीकडेच त्याचे कर्ली टेल्स या साईटला दिलेल्या मुलाखतीतील एक क्लिप स्वतःच्या X खात्यावर शेअर केली. यामध्ये माधवन इंटरमिटंट फास्टिंग केल्याने वजन कमी करण्यास कशी मदत झाली याविषयी सांगत आहे. आपल्याला माहितच असेल की २०२२ मध्ये आर माधवनने रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या सिनेमात भारतीय रॉकेट शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची भूमिका साकारण्यासाठी बरेच वजन वाढवले होते. मात्र या सिनेमानंतर त्याने लगेचच आहाराचे नियम काटेकोरपणे पाळून २१ दिवसांच्या कालावधीत बऱ्यापैकी वजन कमी केले. माधवनने असंही सांगितलं की, “मी माझ्या शरीरासाठी चांगलं असं अन्न खाल्लं. खूप व्यायाम, धावणे, शस्त्रक्रिया, औषधोपचार असं काहीही मी केलेलं नाही.” मग नेमका कोणता फंडा वापरून माधवनने वजन कमी केलं हे आपण आता जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर माधवनने सांगितली वजन कमी करण्याची गोष्ट

माधवनने रॉकेट्रीच्या सेटवरून स्वत:चे काही फोटो देखील शेअर केले होते ज्यात त्याचं वजन खूप वाढलेलं दिसतं. यानंतर त्याने तीन आठवड्यात इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच विशिष्ट पद्धतीने उपवास करून त्याने हे वजन कमी केलं. याबाबत सांगणारा व्हिडीओ शेअर करताना आर माधवनने X पोस्टमध्ये लिहिले की, “इंटरमिटंट फास्टिंग करताना, १) साधारण ४५ ते ६० वेळा अन्न चघळण्याची सवय लावा. तुमचं अन्न प्या व पाणी सुद्धा चावून चावून खा. २) दिवसातील शेवटचं जेवण साधारण ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत करून घ्यावं. ३) फक्त शिजवलेलं अन्नच खावं, दुपारी ३ वाजल्यानंतर कच्चे पदार्थ खाऊ नयेत. ४) सकाळी लवकर चालायला जावं ५) रात्री झोपण्यापूर्वी ९० मिनिटे तरी कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनसमोर वेळ घालवू नये. ६) भरपूर द्रवाचे सेवन करा ७) भरपूर हिरव्या भाज्या खा आणि असं अन्न निवडा जे तुमच्या शरीराला लगेच पचवता येईल. प्रक्रिया केलेलं अन्न शक्यतो टाळाच.”

हे ही वाचा<< श्रावणात कोणती धान्य व फळे खाल्ल्याने शरीराला होतो फायदा? आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या मीठ- मसाला वापरण्याच्या टिप्स वाचा

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय? त्याचे फायदे काय?

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर दोन जेवणांच्या मध्ये तुम्ही उपाशी राहत असणारा वेळ. साधारण १२ ते १६ तासांचा अवधी तुमच्या आहारात असायला हवा. शक्यतो रात्रीच्या वेळी खाणं टाळून हे फास्टिंग केलं जातं. आजवर अनेकांनी याचा फायदा झाल्याचे अनुभव शेअर केले आहेत. त्यात माधवनने उदाहरण सुद्धा समाविष्ट आहे. या इंटरमिटंट फास्टिंगचा फायदा असा की, ही आहाराची पद्धत हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे जळजळ कमी करण्यास, पेशींच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुधारण्यास आणि चरबी जाळण्यास मदत करते. दोन जेवणांमधील अंतर वाढवण्याचा एक मार्ग म्हणून ही पद्धत कार्य करते यामुळे शरीरातील फॅट्स वेगाने बर्न होतात व कॅलरीज शरीरात जाण्याचे प्रमाण कमी होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R madhavan weight loss journey how shaitaan movie fame maddy lost weight in 21 days after rocketry the nambi effect health news svs