उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण राधिकाच्या सुंदर ड्रेसची चर्चा करत आहे. राधिका मर्चंटने ८ जुलै रोजी मुंबईतील अनंत अंबानींच्या कुटुंबीयांच्या घरी, अँटिलिया येथे तिचा हळदी समारंभ साजरा केला. ख्यातनाम फॅशनिस्टा रिया कपूरने स्टाईल केलेली, वधू-वधू कॉट्युअरर अनामिका खन्ना यांनी भरतकाम केलेल्या पिवळ्या लेहेंग्यात राधिका तेजस्वी दिसत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधिकाच्या आकर्षक पोशाखांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी, राधिकाने अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला, सुंदर भरतकाम असलेला पिवळा लेहेंगा परिधान होता. राधिकाने पारंपारिक दागिने आणि खऱ्या फुलांपासून बनवलेली ओढणी देखील त्यावर घेतली होती. राधिकाच्या फुलांच्या ओढणींने सर्वांचे लक्ष वेधले. तिचा हा लूक अनेक नववधूंना प्रेरणा देत आहे.

फिल्ममेकर-स्टायलिस्ट रिया कपूरने डिझायनर अनामिका खन्ना यांच्या दुल्हनच्या कॅनरी यलो (canary yellow) एम्ब्रॉयडरी लेहेंगाचे फोटो शेअर केले आहेत. मुंबईस्थित सृष्टी कलकत्तावाला हिने राधिकासाठी ओढणी बनवली होती. सोशल मीडियावर हा लूक ट्रेंड होऊ लागल्यावर लगेचच तिच्याकडे नववधूंककडून या ओढणीची मागणी होऊ लागली. “काही जण अगदी तसाच दुपट्टा मागत आहेत, तर काहींना त्यांच्या आवडीनुसार तो त्यात बदल करायचा आहे,” असे कलाकाराने सांगितले.

राधिकासाठी, सुमारे २ किलो पिवळ्या झेंडूच फुले आणि ताज -सुगंधी तगरच्या कळ्या (जस्मीन कळ्या) जाळीदार ओढणी तयार केली. कलकत्तावाला सांगते की, तिला ओढणी डिझाइन करण्यासाठी फक्त एक दिवसाचा वेळ मिळाला. ही ओढणी तयार करण्यासाठी पाच करिगारांना सहा-सात तास लागले.”

हेही वाचा –अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा वेगळाच थाट; पाहुण्यांना प्रवासासाठी थेट Falcon-2000 जेटची व्यवस्था!

हेही वाचा – राधिका मर्चंटने हळदीला फुलांनी सजलेला ड्रेस का घातला? २०१८ मधील ‘या’ फोटोत दडलंय कारण

ओढणीची किंमत किती आहे?
हिंदुस्थान टाईमच्या माहितीनुसार, राधिकाचा फुलांची ओढणी हजारो तगर कळ्या (जस्मीन कळ्या) आणि सुमारे २ किलो गेंडा फुल (झेंडू) वापरून बनविला गेला. अशा दुपट्ट्यांची किंमत ₹१५,००० पासून सुरू होते. ओढणीसह फुलांच्या दागिण्यांमध्ये ताज्या पांढऱ्या तगर कळ्यांपासून बनवलेल्या, दागिन्यांमधील कानातले, टॉप्स, चोकरसह दुहेरी नेकलेस, हातफुल (हाताचे दागिने) आणि फुलांचे कलीरे यांचा समावेश होता. ज्याची किंमत सुमारे ₹ २७,००० आहे.

indianexpress.com ला दिलेल्या मुलाखतीत, सृष्टीने सांगितले की, रिया कपूरच्या टीमने समारंभाच्या आदल्या रात्री तिच्याशी संपर्क साधला ही ओढणी तयार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ फार कमी होता. वेळेची कमतरता असतानाही, सृष्टी आणि तिच्या पाच जणांच्या टीमने अवघ्या सहा तासांत अप्रतिम दागिन्यांचा सेट पूर्ण केला.

“हे दागिने पूर्णपणे तयार करण्यासाठी ६ तास आणि ५ लोकांना काम करावे लागले. पांढऱ्या फुलांचा अधिक वापर करण्यास सांगण्यात आले कारण पोशाख पिवळा असेल,” ती म्हणाली. सृष्टीलाही ‘फुलांची चादर’देखील बनवण्यास सांगितले होते, पण वेळेच्या कमतरतेमुळे तिची टीम ते करू शकली नाही. डिझायनरने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “माझ्या माहितीनुसार त्यांच्या स्थानिक फ्लोरिस्टने ओढणी तयार केली.

हेही वाचा – तगर व झेंडूच्या फुलांची ओढणी, पारंपरिक लूक अन्…; अंबानींच्या होणाऱ्या सुनेचं देखणं रुप, हळदी समारंभाचे फोटो व्हायरल

‘गेम चेंजर ठरणार ओढणी
स्टायलिस्ट ईशा भन्साळीला वाटते की, येत्या काळात लग्नाचा हंगामामध्ये फुलांची ओढणी नववधूंमध्ये लोकप्रिय होईल. “फुलांचा पोशाख नववधूंसाठी गेम चेंजर ठरणार आहे. त्यात नवे आकर्षण आहे, परंतु ते काळजीपूर्वक हाताळले जाणे आवश्यक आहे, कारण दुपट्ट्यावरील वास्तविक, ताजी फुले योग्य प्रकारे डिझाइन न केल्यास ते लवकर खराब होऊ शकतात,”

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा बहुप्रतिक्षित विवाह १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. २९ जून रोजी अंबानी निवासस्थानी आयोजित पूजा समारंभाने त्यांच्या पूर्व-विवाह उत्सवाची सुरुवात झाली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhika merchants phoolon ka dupatta for 27000 in huge demand among brides to be snk