एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जाणे ही निश्चितच दुख:द आणि हादरवून टाकणारी गोष्ट असते. त्या व्यक्तीची आठवण जगणे नकोशी करणारी असली तरी कधीकधी याच विरहाच्या भावनेतून काहीतरी चांगले आकाराला येऊ शकते. राफेल डेल कोलच्याबाबतीतही काहीसे असेच घडले. २०१३ मध्ये झालेल्या अपघातात राफेलची पत्नी तातिआनाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राफेल आणि तातिआना यांना रासिया नावाची चिमुकली मुलगी होती. त्यानंतर राफेलला अनेकदा तातिआनाची आठवण येत असे. साधारण वर्षभरापूर्वी राफेलला सतविणाऱ्या याच विरहाच्या भावनेतून छायाचित्रांच्या एका अप्रतिम कलाकृतीला जन्म दिला. राफेल आणि तातिआना यांनी २००९मध्ये विवाहबद्ध होण्यापूर्वी एक फोटोसेशन केले होते. याच फोटोसेशनवरून राफेलला एक अनोखी कल्पना सुचली. त्याने आपल्या लाडक्या पत्नीला भावनिक श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वत:ची लहान मुलगी रासियाबरोबर अगदी तसेच फोटोशुट करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये रासियाचा कपडे, मेकअप, वेशभुषा सगळे काही तातियानाशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे हे फोटोसेशन एकप्रकारे राफेल आणि तातिआनाने एकत्र घालवलेले क्षण जिवंत करणारे ठरले आहे. ब्राझीलमधील रईझ फोटोग्राफिआ यांच्याकडून काढण्यात आलेली छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा