नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो. नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहते.पोटदुखी, अपचन तक्रारी दूर होतात.अशक्तपणा दूर होतो.कंबर दुखत असल्यास नाचणीची पेज प्यावी.शरीरावर फोड आल्यास ते फोडण्याकरिता नाचणीच्या पीठाचे पोटीस बांधावे. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.अशा या बहुगुणी नाचणीचे हिवाळ्यात असंख्य फायदे आहेत. चला तर मग नाचणी खाण्याचे आणखी काय फायदे आहेत जाणून घ्या.
नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. नाचणीमध्ये चांगल्या प्रथिने, कच्चे फायबर, खनिजे देखील असतात त्यामुळे नाचणी गहू किंवा तांदूळपेक्षा जास्त पौष्टिक असते. तसेच नाचणी खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, साखरेच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते.
हिवाळ्यात नाचणी आपल्या आहाराच असणे गरजेचे आहे. फक्त नाचणीची भाकरी किंवा पराठाच नाही तर नाचणीपासून निरोगी लापशी, हलवा, डोसा, लाडू, मफिन्सही तुम्ही बनवू शकता.
नाचणी खाण्याचे फायदे
मधुमेहामध्ये नाचणी खूप फायदेशीर ठरते. यामध्ये पॉलिफेनॉल आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील इतर धान्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे नाचणी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
अशक्तपणा दूर करण्यासाठी देखील तुम्ही नाचणीचे सेवन करु शकता. नाचणी खाणाऱ्या लोकांमध्ये कधीच लोहाची कमतरता भासत नाही. नाचणी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. अॅनिमियाच्या रुग्णांनी आपल्या आहारात नाचणीचा समावेश केल्यास त्याचा फायदा होतो. हिमोग्लोबिन कमी असले तरी देखील नाचणीचे सेवन करणे फायदेशीर ठरु शकते.
तांदळापेक्षा नाचणी कशी चांगली?
सर्व तृणधान्ये आणि बाजरीपैकी, नाचणीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम सर्वाधिक असते. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत नाचणीमध्ये जास्त फायबर, खनिजे आणि सल्फरयुक्त अमीनो अॅसिड असतात. नाचणीमध्ये कोलेस्टेरॉल आणि सोडियम नसतात आणि म्हणूनच हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी मुख्य पदार्थ म्हणून नाचणी योग्य आहे. हे हृदयाच्या वाहिन्यांमध्ये प्लेक आणि फॅटी जमा होण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंचे कार्य आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
हेही वाचा >> हिवाळ्यात पिस्ता खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या
नाचणीचा असा करा आहारात वापर
नाचणी तुम्ही निरनिराळ्या प्रकारे आहारातून घेऊ शकता. मात्र मधुमेहींनी यासाठी दररोज नाचणीची भाकरी अथवा डोसा खावा. ज्यामुळे त्यांना नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. नाचणीच्या भाकरीतून तिच्यातील पोषक घटक तुमच्या शरीराला सहजपणे मिळताच. नाचणी खाण्यामुळे शरीराची झीज लवकर भरून काढली जाते. यासाठीच अशक्तपणा अथवा आजारी व्यक्तीला नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. नाचणी थंड स्वरूपाची असल्यामुळे उन्हाळ्यात आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश जरूर केला जातो.