रक्षाबंधन हा सण अवघ्या एक आठवड्यावर आला आहे. यावेळी मुलं-मुली कपडे आणि गिफ्ट्सची शॉपिंग करतात. मुली आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी ग्रूमिंग सेशनचे प्लॅनिंग करत आहेत. मुली याबाबतीत मागे राहत नाहीत. त्या अगदी नटूनथटून भावाला राखी बांधतात. या उलट भाऊ मात्र गडबडीत स्वतःच्या तयारीकडे लक्ष द्यायला विसरतात किंवा ते याकडे दुर्लक्ष करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाऊ रक्षाबंधनाच्या वेळी कोणतीही तयारी न करता राखी बांधायला बसतात, अशी तक्रार अनेक बहिणींची असते. मुलींइतकीच मुलांनाही ग्रूमिंगची आवश्यकता असते. याचनिमित्ताने आज आपण मुलांसाठी ग्रूमिंगच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

  • स्क्रबिंग गरजेचे

सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, पिंपल्स इत्यादी येतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दर दोन दिवसांनी चेहरा स्क्रब करत राहिलात तर राखीच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त ग्लो दिसून येईल.

Raksha Bandhan 2022: ११ की १२ ऑगस्ट, कोणत्या दिवशी साजरा करावा रक्षाबंधनाचा सण? तज्ज्ञांनी सांगितली योग्य वेळ

  • रुक्ष केस मुलायम करा

जर तुमचे केस कोरडे आणि रुक्ष झाले असतील तर आतापासूनच केसांची अतिरिक्त काळजी घेणे सुरू करा. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. रात्री झोपताना केसांना हलके तेल लावा आणि सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा. रक्षाबंधनाच्या दिवशी केसांना सिरम किंवा हेअर जेल लावायला विसरू नका.

  • अंघोळ केल्यानंतर दाढी करा

बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर दाढी करतात आणि त्यानंतर अंघोळ करतात. पण जर तुम्ही अंघोळीनंतर दाढी केली तर तुमचे केस थोडे अधिक मऊ होतील आणि शेव्हिंग योग्य होईल. जर तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी दाढी करणार असाल तर अंघोळ करून दाढी करावी.

  • नीट केस कापा

सुंदर दिसण्यासाठी, रक्षाबंधनाच्या दोन ते तीन दिवस आधी तुमचे केस कापून घ्या. जर तुमचे केस मोठे असतील तर ते नक्कीच ट्रिम करा. असे केल्याने तुमचा लुक फ्रेश होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan 2022 look smart and handsome this year raksha bandhan follow these tips and earn the admiration of your sisters pvp