Raksha Bandhan Marathi News: जगातील सर्वात खास नात्यांपैकी एक म्हणजे बहीण आणि भावाचे नाते. भाऊ-बहिणीचे हे पवित्र आणि खास नाते साजरे करण्यासाठीच दरवर्षी रक्षाबंधन साजरे केले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षणाचा धागा बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण आणि प्रेम देण्याचे वचन देतात. भाऊ-बहिणीचे अतूट प्रेम आणि आपुलकी रोज पाहायला मिळते. भाऊ-बहीण एकमेकांशी कितीही भांडत असले तरी दोघांमधील परस्पर प्रेम कधीच कमी होत नाही. भाऊ मोठा असो किंवा लहान, तो बहिणीला प्रत्येक सुख देण्याचा आणि तिला प्रत्येक दुःखापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. येथे अशी काही गोष्टी सांगितल्या जात आहेत ज्या प्रत्येक भावाने आपल्या बहिणीसाठी केल्या पाहिजेत.

भावाने बहिणीला अशी द्यावी साथ

आपल्या बहिणीला तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ द्या. कधीकधी पालक तुमच्या बहिणीला पुढे जाण्यापासून रोखतात किंवाच अभ्यास आणि नोकरीपेक्षा लग्नासाठी जास्त दबाव टाकतात असे होऊ शकते. अशा वेळी तुम्ही बहिणीचा हात धरून तिच्याबरोबर उभे राहू शकता. तिच्या निर्णयांना समर्थन देऊ शकता. पालकांविरोधा आपल्या स्वप्नांसाठी लढणाऱ्या बहिणीसाठी हा फार कठीण काळ असतो अशावेळी जर भाऊ पाठीशी असेल तर तिला मानसिक आधार मिळतो.

Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
priyanka Gandhi
Priyanka Gandhi : भावाला दिलेलं चॅलेंज बहिणीने पूर्ण केलं; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं मोदी-शाहांना प्रतिआव्हान
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
Ajit Pawa
Ajit Pawar : “आई म्हणाली, माझ्या लेकाला…”, अजित पवारांच्या बहिणीनं सांगितलं पवार कुटुंबात काय घडतंय
Aruna Sabane asked harassed Priya Phuke is not beloved BJP sister
प्रिया फुके ही सरकारची ‘लाडकी बहीण ‘नाही आहे का? सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा सवाल
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

भाऊ जितका मोठा तितके प्रेम

भाऊ मोठा असेल तर खूप दादागिरी करतो, असे अनेकदा दिसून येते. पण तुम्ही या रूढीवादी गोष्टीला मागे टाकून तुमचा स्वतःचा नवीन मार्ग तयार करू शकता. तुम्ही असा विचार करू शकता की जितका मोठा भाऊ, तितकेच जास्त प्रेम. तुमच्या बहिणीवर दादागिरी करू नका उलट तिचे लाड करा. तुम्ही कायम तिच्यासोबत आहात याची जाणीव करून द्या.

हेही वाचा – Beauty Tips: पहिल्यांदाच ‘स्पा’ करणार आहात? मग महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

एकमेकांचा आदर राखा

बहिणी भावाचा आदर करतात आणि भावानेही बहिणीचा आदर केला पाहिजे. भांडण असो किंवा परस्पर मतभेद असो, आदराची भावना नष्ट होऊ देऊ नका. बहीण जरी लहान असली तरी ती तिच्या भावाकडून आदरास पात्र असते.

समजून घेण्याचा प्रयत्न करा

कधी-कधी बहिणीची अपेक्षा असते की, तिच्या भावाने तिला समजून घ्यायला हवे. काही वयानंतर, मुले जितके एकमेकांना समजून घेऊ लागतात तितके पालक मुलांना समजून घेत नाहीत. वयातील कमी अंतरामुळेही हे घडते. अशा वेळी कधी कधी भाऊ म्हणून नाही तर मित्र बनून तुम्ही तुमच्या बहिणीचे मत ऐकू आणि समजून घेऊ शकता.

तुमचा आत्मविश्वास कमी करू नका तर वाढवा

भाऊ आपल्या बहिणीला जाडी किंवा हत्ती अशी नावाने बोलवातात. ही जवळजवळ प्रत्येक घरातील गोष्ट आहे. कधी प्रेमाने असे बोलले जाते, तर कधी चेष्टेने आणि कधी रागाने. पण, गंमतीने सांगितलेली ही गोष्ट बहिणीचा आत्मविश्वास दुखावू शकते, कमी करू शकते. म्हणूनच तुमच्या बहिणीची स्तुती करण्यास कधीही संकोच करू नका आणि तिला नेहमीच नावे ठेवण्याऐवजी कौतूक करून तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा – गुलाबपाण्याच्या आइस क्यूब्सने करा चेहऱ्याला मसाज; त्वचेवर येईल तेज!

बहिणीला स्वसंरक्षण कौशल्य शिकवा

प्रत्येक मुलीला स्वसंरक्षणाचे गुण माहित असले पाहिजेत. भाऊ बहिणीसोबत कायम राहू शकत नाही. शाळा-कॉलेजातून ऑफिसला जाताना आणि लग्नानंतर बहीण भावापासून दूर जाते. अशा प्रसंगी बहिणीला स्वतःचे रक्षण करावे लागेल. म्हणून भावाने बहिणीला स्वसंरक्षणाविषयी शिकवावे. बहिणींना कराटे, बॉक्सिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळवून द्या, जेणेकरून त्यांना कोणताही अनोळखी धोका टाळता येईल.