Raksha Bandhan 2023 Gift Ideas: जगातील सर्वात खास नात्यांपैकी एक म्हणजे बहीण आणि भावाचे नाते. भाऊ-बहिणीचे हे पवित्र आणि खास नाते साजरे करण्यासाठीच दरवर्षी रक्षाबंधन साजरे केले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षणाचा धागा बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण आणि प्रेम देण्याचे वचन देतात. भाऊ-बहिणीचे अतूट प्रेम आणि आपुलकी रोज पाहायला मिळते. भाऊ-बहीण एकमेकांशी कितीही भांडत असले तरी दोघांमधील परस्पर प्रेम कधीच कमी होत नाही. भाऊ मोठा असो किंवा लहान, तो बहिणीला प्रत्येक सुख देण्याचा आणि तिला प्रत्येक दुःखापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाऊ-बहिणीच्या नात्यातील आनंदाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन या वर्षी ३० ऑगस्ट म्हणजे बुधवारी साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधल्यानंतर भावाने बहिणीला गिफ्ट द्यायची एक परंपरा आहे. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीला काहीतरी हटके गिफ्ट देण्याचा विचार करत आहेत. मात्र काय द्यायचे हे तुम्ही ठरवू शकत नसाल , तर आज आपण अशी काही गिफ्ट्स पाहणार आहोत जे तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ शकता.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणीला भेट द्या एकापेक्षा एक ‘ही’ भारी ब्युटी प्रॉडक्ट्स, एकदा पाहाच

स्मार्ट वॉच

हल्लीच्या काळामध्ये अनेक कंपन्यांनी आपली स्मार्टवॉच बाजारात सादर केली आहेत. स्मार्टवॉचमध्ये अनेक फीचर्स वापरकर्त्याला मिळत असतात. हेल्थ फीचर्स, स्पोर्ट्स मोड असे अनेक फीचर्स येतात. यामुळे तुम्ही यंदा तुमच्या बहिणीला एखादे लेटेस्ट स्मार्टवॉच गिफ्ट म्हणून देऊ शकता. यामुळे तुम्ही बहीण खूप आनंदी होईल.

आवडते पुस्तक

जर का तुमच्या बहिणीला वेगवेगळी पुस्तके वाचण्याची आवड असेल तर तुम्ही तिला तिच्या आवडत्या लेखकाची पुस्तके गिफ्ट म्हणून देऊ शकता. एखाद्या पुस्तकांऐवजी तिच्या आवडत्या लेखकांच्या पुस्तकांचा संच देखील देऊ शकता. या गिफ्टमुळे तुमची बहीण खुश होईल.

स्पा अपॉईंटमेंट

स्पा किंवा पार्लरची अपॉइंटमेंट देखील मुलींसाठी एक उत्तम भेट आहे. तुम्ही तुमच्या बहिणीसाठी स्पा अपॉइंटमेंट बुक करू शकता. या गिफ्टमुळे तुमची बहीण खूप आनंदी होईल.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भाऊरायासाठी घरच्या घरी तयार करा ‘या’ मिठाई

योगा मॅट

तुमचीही बहिण व्यायाम करत असेल, तिला फिटनेसची आवड असल्यास तुम्ही तिला योग करण्यासाठी योग मॅट गिफ्ट म्हणून देऊ शकता. या गिफ्टचा फायदा तिला रोज येईल. तुम्ही तिला हे गिफ्ट दिले असल्याने रोज व्यायाम करताना तिला अधिक आनंद होईल.

स्टायलिश हॅन्डबॅग

मुलींना नवनवीन हॅन्डबॅग म्हणजेच पर्स वापरण्याची आवड असते. वेगवेगळ्या स्टायलिश कपड्यांवर त्याला मॅच होतील अशा हॅन्डबॅग वापरणे त्यांना आवडत असते. यंदा तुम्ही तिला स्मार्ट लूक असणारी स्टायलिश बॅग देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता. तसेच तुम्ही तिला कोणत्याही ड्रेसवर मॅच होईल अशी बॅग देखील देऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan 2023 stylish hand bag spa appointment smart watch gift ideas to our sister tmb 01
Show comments