Raksha Bandhan Outfit Ideas: भाऊ आणि बहिणींमधील अनोखे बंध साजरे करणारा रक्षाबंधन हा सण सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा आहे. या दिवशी कुटुंबे एकमेकांना भेटतात, मनापासून भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि प्रेमळ आठवणींना उजाळा देतात. भावा-बहि‍णींसाठी हा सण खूप खास असला तरी बहिणींचं मात्र नेहमीचच असतं की रक्षाबंधनाला काय बरं परिधान करावं? या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही देणार आहोत. यावर्षीच्या फॅशन ट्रेंडमध्ये असणारे पोशाख तुमच्या घरात नक्कीच असतील. फक्त त्याची निवड योग्य करणे गरजेचे आहे.

ते म्हणतात ना ‘ओल्ड इज गोल्ड’, तसंच काहीसं पोशाखाच्या फॅशनमध्येदेखील (Raksha Bandhan Outfit Ideas) आहे. जुन्या आणि पूर्वीच्या स्टाईलच्या कपड्यांना मॉडर्न टच देऊन तुम्ही या रक्षाबंधनला हे सहा पर्याय नक्कीच ट्राय करू शकता.

campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
balmaifal article loksatta
बालमैफल: स्वच्छ सुंदर सोसायटी…
actor jitendra joshi speech in Sarva Karyeshu Sarvada Event
सामाजिक काम करणाऱ्यांना आपलेसे करा!
Similipal Tiger Project officials released tigress relocated from Tadoba Andhari Tiger Project into wild
ओडिशातील ‘मेलेनिस्टिक’ वाघांसोबत महाराष्ट्रातील वाघिणीचा संचार
Aruna Sabane asked harassed Priya Phuke is not beloved BJP sister
प्रिया फुके ही सरकारची ‘लाडकी बहीण ‘नाही आहे का? सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा सवाल
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : आगलाव्या भाषणावर आयोग गप्प राहील…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे

१. अनारकली सूट (Anarkali Suit)

अनारकली हा एक टाइमलेस ड्रेस आहे, जो कित्येक वर्षे ट्रेंडमध्ये असूनही तितकाच शोभून दिसतो. अनारकलीमध्ये भरतकाम असल्याने तो एक पारंपरिक टच देऊन जातो. अनारकली ही रक्षाबंधनासाठी एक अत्यंत योग्य निवड ठरेल. जर तुम्ही खूपच गोंधळात असाल तर हा पर्याय तुमच्यासाठीच आहे. सध्या पेस्टल रंगाचा ट्रेंड असल्याने तुम्ही तसे अनारकली सूट निवडू शकता. मिनिमल वर्क असलेल्या अनारकलीवर नेकलेस परिधान न करता हेवी इयरिंग्सची निवड केली तर लूक परिपूर्ण दिसण्यास मदत होईल. तर ज्वेलरीमध्ये झुमके, स्टेटमेंट रिंग्स, हातात मॅचिंग बांगड्या घातल्याने तुमचा ‘रक्षाबंधन OOTD’ पूर्ण होईल. तसंच तुम्ही यावर खुले केस ठेवू शकता किंवा वेगवेगळ्या हेअरस्टाईल ट्राय करू शकता.

२. लेहेंगा चोळी (Lehenga Choli)

लेहेंगा चोळीचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून वाढत चालला आहे. प्रत्येक सणाला लेहेंगा चोळीची निवड आजकाल सहज केली जाते. यामध्ये तुम्ही कलरफुल असा लेहेंगा परिधान करू शकता. मिरर वर्क किंवा सिक्वेन्स आणि शाईन असलेला लेहेंगा तुम्ही निवडू शकता. लेहेंग्यावर कॉन्ट्रास्ट असलेलं ब्लाऊज तसंच ओढणी परिधान करून हा लूक पूर्ण करू शकता. ज्वेलरीसाठी मांग टिक्का, नेकलेस किंवा चोकर, बांगड्या यांची निवड सर्वोत्तम ठरू शकेल. आउटफिटला मॅचिंग अशी हिल्स तसेच एक पोटली बॅग कॅरी करून तुम्ही ‘रक्षाबंधन रेडी’ होऊ शकता.

३. साडी (Saree)

भारतीय स्त्रियांचा सगळ्यात आवडता पोशाख म्हणजे साडी. कोणताही सण-वार असो साडीची फॅशन कधीच जुनी होऊ शकत नाही. भारतीय स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली ही साडी तुम्ही या खास क्षणी नेसू शकता. हलकी सिल्क किंवा शिफॉन साडीचा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. पेस्टल रंगाचा ट्रेंड सुरू असल्याने तुम्ही तसे रंगदेखील ट्राय करू शकता. तसेच फ्लोरल प्रिंट साडीदेखील सध्या चर्चेत आहे. साडीचा लूक पूर्ण करण्यासाठी दागिन्यांची निवडदेखील महत्त्वाची ठरते.

४. कुर्ता प्लाझो सेट (Kurta Palazzo Set)

कुर्ता प्लाझो म्हणजे अनेकींसाठी कंफर्ट आउटफिट. प्रिंटेड किंवा एम्ब्रॉयडरी कुर्ता विथ कॉन्ट्रास्ट प्लाझो हा पर्याय रक्षाबंधनसाठी सर्वोत्तम ठरेल. ज्यांना स्टाईलिश लूक हवा असेल, पण त्याचबरोबर कंफर्टलादेखील ते प्राधान्य देत असतील त्यांच्यासाठी ही निवड योग्य ठरेल. झुमके, बांगड्या, बिंदीचा वापर करून तुम्ही हा लूक पूर्ण करू शकता.

५. शरारा सूट (Sharara Suit)

शरारा सूट फॅशनमध्ये कमबॅक करत आहेत. लहान कुर्ती आणि दुपट्ट्यासह असलेल्या फ्लेअर पँट्स फेस्टिव लूकसाठी अगदी सर्वोत्तम पर्याय ठरतात. भरतकाम किंवा मिरर वर्कसह असलेला शरारा सेट निवडा. झुमका, ब्रेसलेट आणि हिल्ससह हा लूक पूर्ण करा.

६. मॅक्सी ड्रेस (Maxi Dress)

ज्यांना पारंपरिक लूकला मॉडर्न टच द्यायचा असेल त्यांच्यासाठी मॅक्सी ड्रेस हा सर्वोत्तम पर्याय ठरेल. रक्षाबंधनच्या या खास क्षणासाठी ब्राइट कलर तसेच वर्क असलेले आणि प्रिंटेड असे ड्रेस निवडा. यावर नेकलेस, बोहेमियन कानातले तसेच रिंग्स अशा दागिन्यांची निवड करा. याबरोबर एक बॅगदेखील घेऊ शकता.

हेही वाचा… Raksha Bandhan Mehndi Design: रक्षाबंधनासाठी ‘या’ सोप्या मेंदी डिझाइन्स ट्राय कराच! आणखी शोभून दिसेल तुमचा लूक

यापैकी तुमच्या आवडीनुसार कोणताही पर्याय निवडून त्याला फिनिशिंग टच देणं खूप गरजेचं आहे. हेअरस्टाईलसाठी मोकळे केस किंवा लो बन अशी पद्धत तुम्ही ट्राय करू शकता. सध्या मेकअपमध्ये ट्रेंडिग असलेला नो मेकअप लूक, न्यूड मेकअप तुम्ही ट्राय करू शकता. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मेकअपआधी स्किनकेअर करायला विसरू नका, यातही मॉइश्चराईजर आणि सनस्क्रिन आवर्जून लावा. फ्यूजन, इंडो-वेस्टर्न (Raksha Bandhan Outfit Ideas) लूकदेखील सध्या चर्चेत आहे. या रक्षाबंधनाला यातला खास लूक एकदा करून पाहाच.