Raksha Bandhan 2023 Gift Ideas: रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमा. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधते. भाऊ-बहिणीच्या नात्यातील हा एक आनंदाचा दिवस असतो. भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. श्रावणतील महत्त्वाच्या सणांमध्ये रक्षाबंधनाचाही समावेश होतो. या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. प्रदेशानुसार कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

देशभरातील भाऊबहीण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तूही देतात. यंदा ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. शुभ मुहूर्ताच्या वेळी भावाला राखी बांधल्यास हे फलदायी सिद्ध होते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. 

father of rape victim change birth record to save accused
Jaipur Crime News : बाप नव्हे हैवान! बलात्कारी आरोपीला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलीची बदलली जन्मतारीख
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
contract teachers, agitation ,
कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयावर टीकेची झोड, निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
elderly woman drives an auto at night to earn a living
‘भीक मागण्यापेक्षा…’ उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवणाऱ्या आईची गोष्ट; VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
customers surprise delivery boy with birthday celebration
VIDEO: असा वाढदिवस होणे नाही! ग्राहकाने दरवाजा उघडताच गाणं वाजलं अन्… डिलिव्हरी बॉयने अनुभवला आनंदाचा क्षण!
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल
Shikhar Dhawan son Zoravar
Shikhar Dhawan : ‘आशा आहे की त्याला कळेल…’, निवृत्तीनंतर शिखर धवनचा मुलगा झोरावरसाठी भावनिक संदेश

हेही वाचा : तुमचा भाऊ तुमच्यापासून दूर राहतोय? ‘या’ सोप्या टिप्स वापरून साजरे करा रक्षाबंधन

कपडे

मुलींना नवनवीन कपडे खरेदी करणे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यानुसार कपडे परिधान करणे हे खूप आवडते. मॉडर्न आणि पारंपरिक वेशभूषा मुलींना आवडते. तुम्ही तुमच्या बहिणीला एखादा छानसा ड्रेस, साडी किंवा किंवा एखादा वेगळे डिझायनर कपडे भेट देऊ शकता. यामुळे तुमच्या बहिणीला देखील खूप आनंद होईल.

ज्वेलरी

राखीपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या बहिणीला तुम्ही ज्वेलरी देखील भेट देऊ शकता. सोने किंवा चांदीची ज्वेलरी ही कायमच चांगली भेट असते. मात्र जर का तुमचे तेवढे बजेट नसेल तर तुम्ही तुमच्या बहिणीला अन्य धातूंपासून तयार करण्यात आलेली चांगली ज्वेलरी भेट देऊ शकता. ज्यात गळ्यातील चेन, कानातील झुमके आणि हातात ब्रेसलेट अशा प्रकारची ज्वेलरी भेट देऊ शकता.

रक्षाबंधन हे बहीण आणि भावासाठी एक आनंदाचा सण असतो. यावेळी भाऊरायाला प्रश्न पडतो की आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचे? अशावेळी तुमच्या बजेटमध्ये असणारे असे प्रिंटेड टी- शर्ट , मग, कप किंवा पिलो भेट देऊ शकता. याचा वापर तिला रोजच्या जीवनात देखील करता येऊ शकतो.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: ‘रक्षाबंधन’ निमित्त बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ शकता ‘हे’ बेस्ट गॅजेट्स

हँडबॅग्ज

लहान मुलींपासून ते अगदी ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वानाच हॅन्डबॅग वापरण्याची सवय असते. त्याला आपण पर्स असेही म्हणतो. वेगवगेळ्या आकारात आणि डिझाइनमध्ये हॅन्डबॅग बाजारात उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या बहिणीला छानशी हॅन्डबॅग देखील भेट देऊ शकता.